आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:06 AM2019-02-26T00:06:27+5:302019-02-26T00:06:37+5:30
वाळूज एमआयडीसीतील जगदीश भराड यांच्या मारेकऱ्याच्या शोधार्थ तीन पथके स्थापन केली आहेत. तिन्ही पथके सोमवारी विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितली.
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील जगदीश भराड यांच्या मारेकऱ्याच्या शोधार्थ तीन पथके स्थापन केली आहेत. तिन्ही पथके सोमवारी विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितली. दरम्यान, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन कंपनीतील व लगतच्या कामगारांशी चर्चा केली.
वाळूज एमआयडीसीतील उद्योजक दीपक भराड यांचा चुलत भाऊ जगदीश भराड यांचा सोमेश विधाटे या माजी कामगाराने किरकोळ कारणावरून शनिवारी रात्री लोखंडी फावड्याने निर्घृण खून केला. त्यानंतर मारेकरी सोमेश विधाटे हा फरार झाला आहे. पोलिसांनी सोमेशच्या नातेवाईकांची चौकशी करून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांकडून आरोपी सोमेशची फारशी माहिती न मिळाल्यामुळे पोलिसांनी तीन पथके स्थापन करून त्याच्या शोधार्थ विविध ठिकाणी रवाना केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना कु ल शब्द(117)
आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना
जगदीश भराड खून प्रकरण : पोलीस उपायुक्तांकडून घटनास्थळाची पाहणी