कसाबखेडा रस्त्याचे तीन-तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:12+5:302021-09-18T04:06:12+5:30
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून जणू तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पाच मिनिटाच्या या रस्त्यासाठी पंधरा ते ...
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून जणू तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे पाच मिनिटाच्या या रस्त्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले होते; परंतु अपुऱ्या निधीअभावी काम थातूरमातूर पद्धतीने करण्यात आले. गाव मोठे असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते; परंतु याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून रस्त्याची ही दुरवस्था झालेली आहे. पावसामुळे दररोज छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर घडत आहेत. संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक झालेला असून वाहनधारकांना कंबर व मणक्याचे आजार जडले आहेत. हा रस्ता कधी दुरुस्त होणार असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.
170921\img_20210712_084722.jpg
कसाबखेडा जिल्ला परीषद शाळेसमोरील हे छायाचित्र खड्डे व पाणी तुंबलेले असल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे
छायाचित्र बाळकृष्ण दवंडे कसाबखेडा