फुलंब्री तालुक्यात तीन हजार कृषीपंपांचा विद्युत पुरवठा कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:06 AM2021-02-13T04:06:01+5:302021-02-13T04:06:01+5:30
फुलंब्री तालुक्यात कृषीपंपधारकांची संख्या १८ हजार ४९८ एवढी आहे. या ग्राहकांनी गेल्या अनेक वर्षांपासून महावितरण कंपनीची बिले भरलेली नाहीत. ...
फुलंब्री तालुक्यात कृषीपंपधारकांची संख्या १८ हजार ४९८ एवढी आहे. या ग्राहकांनी गेल्या अनेक वर्षांपासून महावितरण कंपनीची बिले भरलेली नाहीत. परिणामी महावितरणचे १९५ कोटी ६७ लाख रुपये थकबाकी झालेली आहे. ही थकलेली बिले वसूल करण्यासाठी कंपनीने अनेक वेळा आवाहन केले, पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीमध्ये महावितरणकडून वीज पुरवठा कापला जात आहे. महावितरणने थकीत कृषीपंपधारक ग्राहकांकरिता चांगली ऑफर आणली आहे. या योजनेत तात्काळ थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना शंभर टक्के व्याज, शंभर टक्के विलंब कर माफ केला जाणार आहे, तसेच मार्च २०२२ पर्यंत मूळ थकबाकी भरल्यास ५० टक्के रक्कम माफ केली जाईल, तर २०२३ पर्यंत भरल्यास ३० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे.
कोट-
फुलंब्री तालुक्यात थकबाकी असलेल्या तीन हजार ग्राहकांची वीज कापण्यात आली असून, उर्वरित ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. तेव्हा ग्राहकांनी महावितरण कंपनीला सहकार्य करून वीज बिले भरावीत.
- अरुण गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण
फोटो कॅप्शन : फुलंब्री तालुक्यात थकबाकी असलेल्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करताना महावितरणचे कर्मचारी.
120221\rauf usman shaik_img-20210212-wa0039_1.jpg
फुलंब्री तालुक्यात थकबाकी असलेल्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करताना महावितरणचे कर्मचारी.