गरम भाजीत पडून भाजल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 04:03 PM2019-06-25T16:03:58+5:302019-06-25T16:07:20+5:30
खेळताखेळता अचानक चक्कर येऊन उकळत्या भाजीच्या पातेल्यावर पडला
औरंगाबाद : खेळताखेळता चक्कर येऊन उकळत्या भाजीच्या पातेल्यावर पडल्याने डोके व चेहरा भाजून गंभीररित्या जखमी एका तीन वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. हर्षल संतोष गाधु (३ ) असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिखलठाणा येथील पुष्पक गार्डन येथे गाधु परिवार राहतो. त्यांना हर्षल नावाचा तीन वर्षीय मुलगा आहे. सोमवारी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास हर्षल स्वयंपाक घरात खेळत होता. याच दरम्यान, पातेल्यामध्ये गरम भाजी ठेवण्यात आली. हर्षल याला खेळताना अचानक चक्कर आल्याने तो गरम भाजीच्या पातेल्यावर पडला.यातील गरम यावेळी हर्षलचा चेहरा आणि डोके भाजले गेले. यानंतर हर्षलला ताबोडतोब मिनी घाटी येथे दाखल करण्यात आले. येथे प्राथमी उपचार केल्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आहे. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ७. ४५ वाजेयादरम्यान हर्षलचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.