लैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी

By Admin | Published: February 17, 2016 11:38 PM2016-02-17T23:38:12+5:302016-02-17T23:46:14+5:30

बिलोली : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी एका तरुणास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा बिलोलीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली़

Three years of forced labor for sexual abuse | लैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी

लैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी

googlenewsNext

बिलोली : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी एका तरुणास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा बिलोलीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली़
धर्माबाद तालुक्यातील कारेगाव येथील एका १३ वर्षीय मुलीस शेतावरून परत येत असताना आरोपी माधव सोनकांबळे (वय २५) याने जबरदस्तीने रस्त्याच्या शेजारी ओढत नेले व लैंगिक अत्याचार केला़ सदरील घटनेत धर्माबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला़ प्रकरण २२ मे २०१४ रोजी कारेगावच्या शेतशिवारात घडले़
घटनेनंतर प्रकरण बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आले़ दरम्यान, घटनेतील सहा साक्षीदारांची साक्ष न्यायालयात ग्राह्य धरण्यात आली़ ज्यात आरोपी माधव सोनकांबळे याच्यावरील आरोप सिद्ध झाले़ बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये न्या़अनंत पाटील यांनी आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड आकारला़ सरकार पक्षाकडून अ‍ॅड़दिलीप कुलकर्णी बोमनाळीकर यांनी बाजू मांडली़ (वार्ताहर)

Web Title: Three years of forced labor for sexual abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.