बंधाऱ्याला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2016 01:01 AM2016-10-08T01:01:11+5:302016-10-08T01:14:41+5:30
गजानन काटकर , वडोदबाजार फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील गिरिजा नदीवरील कोल्हापुरी बंधारा तुडुंब भरून वाहत आहे. मात्र दरवाजे व रबर खराब झाल्याने पाण्याची
गजानन काटकर , वडोदबाजार
फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील गिरिजा नदीवरील कोल्हापुरी बंधारा तुडुंब भरून वाहत आहे. मात्र दरवाजे व रबर खराब झाल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने बंधाऱ्यातील पाणी वाया जात आहे.
येथील गिरिजा नदीवर पंधरा वर्षांपूर्वी पुल वजा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. त्यानंतर बंधाऱ्याची दुरुस्तीच झाली नाही. देखभाल दुरूस्तीऐवजी बंधाऱ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाया जाते.
याकडे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या बंधाऱ्याचे लोखंडी दरवाजे गंजलेल्या अवस्थेत आहेत. ते पाण्याचा दाब सांभाळून तग धरून आहेत. बहुतेक दरवाजांना छिद्रे पडले आहे. तर काही दरवाजांचा अर्धेअधिक पत्राच खराब झाला आहे.
विशेष म्हणजे दरवाजाला नव्याने रबर (वायसर ) एकदाही बसविण्यात आले नाही. परिणामी पाण्याची गळती होत आहे. सध्या बंधारा तुडंूब भरलेला आहे. त्यामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाण्याची समस्या तूर्तास तरी दूर झाली आहे. गेल्या अनेक वर्षानंतर यंदा गत महिनाभरापासून नदीला स्वच्छ पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली आहे. रविवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी या परिसरातून होत आहे.