आयसीएफतर्फे कलावंतीणदुर्ग, सांधनदरी गिरीभ्रमण मोहीम फत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:22 AM2018-06-13T00:22:24+5:302018-06-13T00:23:02+5:30
इंडियन कॅडेट फोर्सतर्फे (आयसीएफ) आयोजित कलावंतीण दुर्ग व सांधनदरी या गिरीभ्रमण मोहिमेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. पनवेल येथील ठाकूरवाडी गावातील २३00 फूट उंचीवरील कलावंतीणदुर्ग या गडावर आधी गिरीभ्रमण करण्यात आले. या गिरीभ्रमण मोहिमेत औरंगाबाद शहरातील ३0 साहसी क्रीडाप्रेमी युवक व युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला
औरंगाबाद : इंडियन कॅडेट फोर्सतर्फे (आयसीएफ) आयोजित कलावंतीण दुर्ग व सांधनदरी या गिरीभ्रमण मोहिमेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. पनवेल येथील ठाकूरवाडी गावातील २३00 फूट उंचीवरील कलावंतीणदुर्ग या गडावर आधी गिरीभ्रमण करण्यात आले. या गिरीभ्रमण मोहिमेत औरंगाबाद शहरातील ३0 साहसी क्रीडाप्रेमी युवक व युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील साम्रद गावाजवळील सांधनदरी येथे रॅपलिंगचे आयोजन करण्यात आले. त्यात ४0 साहसी युवक-युवती व क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते. सुरुवातीला किशोर नावकर यांनी रॅपलिंग योग्यप्रकारे कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखवत सूचना दिल्या. रॅपलिंग केल्यानंतर पुढील मार्गावरून पुन्हा गिरीभ्रमणाचा आनंद युवक-युवतींनी घेतला. ही मोहीम फत्ते करण्यासाठी इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर नावकर, मोहंमद अस्लम, राहुल अहिरे, राज घोगरे, संदेश कदम, अमित ससाणे, दीपक कोलते, मनीष पहाडिया यांनी परिश्रम घेतले आहे. १६ व १७ जून रोजी आयसीएफतर्फे महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवर असणाऱ्या कळसूबाई शिखर मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाºयांनी इंडियन कॅडेट फोर्स, हिंदी राष्ट्रभाषा भवन, पैठण गेट अथवा किशोर नावकर, राहुल अहिरे, राज अहिरे यांच्याशी संपर्क साधावा. या मोहिमेत जास्तीत जास्त गिरीप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयसीएफचे कमांडर विनोद नरवडे यांनी केले आहे.