जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेवर शेण फेक; छत्रपती संभाजीनगरात सर्व पक्षीय निषेध आंदोलन
By बापू सोळुंके | Published: January 4, 2024 06:40 PM2024-01-04T18:40:55+5:302024-01-04T18:41:08+5:30
आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू रामंचद्र यांच्याविषयीच्या विधानावर हिंदूत्वावादी कार्यकर्ते आक्रमक झाले.
छत्रपती संभाजीनगर: प्रभू श्रीराम हे मांसाहरी होते, असे विधान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले. यात भाजप, मनसे, श्रमिक छावा संघटनेसह अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी गजानन महाराज मंदीर चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेवर शेण टाकले.
आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू रामंचद्र यांच्याविषयीच्या विधानावर हिंदूत्वावादी कार्यकर्ते आक्रमक झाले. गुरूवारी दुपारी भाजपा, श्रमिक छावा, मनसे आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आव्हाड विरोधात निदर्शने केली. या वेळी त्यांच्या प्रतिमेला शेण खाऊ घालत त्यांचा निषेध करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, जितेंद्र आव्हाड हाय, हाय, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात ज्ञानेश्वर गायकवाड, शैलेश भिसे, संकेत शेटे, गणेश उगले पाटील, नीलेश डव्हळे , नीलेश धस, गणेश थोरात, वसंत पवार, प्रशांत दहीवाडकर, विजय लाळे, श्री भंडारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.