थंडी वाढली, तापमान ९.८ अंशांखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:03 AM2018-12-13T00:03:18+5:302018-12-13T00:04:02+5:30
औरंगाबाद : दोन दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. शहरात बुधवारी किमान ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेनेदिली आहे.

मराठवाड्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे शहरवासीयांना थंडी जरा उशिरानेच अनुभवायला मिळाली. शहरात आॅक्टोबरअखेर थंडीची चाहूल लागली होती. परंतु अचानक थंडी गायब झाली. त्यानंतर ११ नोव्हेंबरपासून थंडीत वाढ होत असल्याचे जाणवत असताना पुन्हा तापमानात वाढ झाल्याचा अनुभव शहरवासीयांना आला.
शहरात २ डिसेंबर रोजी किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. परंतु त्यानंतर पुन्हा तापमान वाढले. आता गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. शहराचे किमान तापमान मंगळवारी १०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आणि बुधवारी ९.८ अंशांपर्यंत तापमान घसरले. वाढलेल्या थंडीमुळे सायंकाळनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेली वर्दळही कमी जाणवत होती. थंडीमुळे रात्री व पहाटे नागरिक ऊबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडत आहेत.