भोकरमध्ये वादळाचे थैमान

By Admin | Published: June 24, 2017 12:13 AM2017-06-24T00:13:22+5:302017-06-24T00:16:38+5:30

भोकर : शहरासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले़

Thunderstorm | भोकरमध्ये वादळाचे थैमान

भोकरमध्ये वादळाचे थैमान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : शहरासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले़ यात शहरातील एका घराची भिंत पडून एक जखमी झाला तर शेकडो घरावरची पत्रे उडाल्याच्या घटनेने जनजीवन भयभीत झाले होते.
दिवसभराच्या उकाड्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अचानक वादळाने थैमान घातले़ यात जोराचा पाऊसही झाला. वादळाची तीव्रता एवढी भयंकर होती क, यात अनेक झाडे मुळासकट उखडलील तर काही घरांची पडझड झाली. यात शहरातील प्रफुल्लनगर येथे घराचे बांधकाम सुरु असलेली भिंत कोसळून गणपत माधव मुनेश्वर (वय ३२, शिक्षक भुजंगराव मा. विद्यालय रिठ्ठा) जखमी झाले. भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. पोहरे यांनी प्राथमिक उपचार करुन नांदेडला हलविले. वादळी वाऱ्याने भोकर ते उमरी मार्गावर सागवान फाटा येथे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. विद्युत खांबे पडल्याने तारा तुटून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. शहरातील गांधीनगर, शास्त्रीनगर, समतानगर, शनीदेव मंदिर परिसरातही शेकडो घरांवरचे पत्रे उडाले. यात समतानगर येथे प्रकाश पोचिराम वाघमारे यांचे टिनाचे पूर्ण घरच कोसळले. घरातील सर्व जण पलंगाखाली दडल्याने बालंबाल बचावले. बिलालनगर रस्त्यावरील झाड कोसळून विद्युत तारा तुटून पडल्या. तर कित्येक घराच्या भिंती कोसळल्या. १५ मिनिट वादळी वाऱ्याने थैमान घातल्याने जनजीवन भयभीत झाले होते.

Web Title: Thunderstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.