डीजेचा तिढा मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2016 12:17 AM2016-04-12T00:17:48+5:302016-04-12T00:42:04+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत डीजे वाजविण्याच्या बंदीवरून पोलीस प्रशासन आणि दलित संघटनांमध्ये निर्माण झालेला तिढा अखेर सामोपचाराने मिटला
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत डीजे वाजविण्याच्या बंदीवरून पोलीस प्रशासन आणि दलित संघटनांमध्ये निर्माण झालेला तिढा अखेर सामोपचाराने मिटला. सोमवारी पोलीस आयुक्तांसोबत आणि दलित संघटनांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत न्यायालयाच्या निर्णयानुसार ५५ डेसिबलच्या आत वाजणारे ‘टू- वे स्पीकर’ वाजविण्यास सहमती दर्शविली. समज- गैरसमज दूर झाल्यानंतर दलित संघटनांच्या नेत्यांनी आयुक्तांच्या विरोधात मंगळवारी (दि. १२) काढण्यात येणारा मोर्चा रद्द केल्याचे जाहीर केले.
बुधवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी १४ एप्रिलनिमित्त आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत डीजे वाजविण्यास बिलकुल परवानगी (पान २ वर)
‘डीजे’साठी औरंगाबाद खंडपीठात याचिका
औरंगाबाद : १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत नियमाच्या अधीन राहून ‘डीजे’ ला परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर उद्या मंगळवारी न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.
मुकुंदवाडी येथील साऊंड सिस्टीम व्यावसायिक रविकांत पाचुंदे यांनी अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली असून, औरंगाबादचे पोलीस आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांना प्रतिवादी केले आहे. खंडपीठाने यापूर्वीच या प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिलेला आहे. दोन दिवसांनंतर डॉ. आंबेडकर जयंती असल्यामुळे याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती (पान २ वर)