वाघाचे संरक्षण व संवर्धन गरजेचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:05 AM2021-07-30T04:05:21+5:302021-07-30T04:05:21+5:30
गौताळा अभयारण्यात हिवरखेडा माहिती केंद्रात व्याघ्रदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थितांना मार्गदर्शन करताना सत्यजित गुजर बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ...
गौताळा अभयारण्यात हिवरखेडा माहिती केंद्रात व्याघ्रदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थितांना मार्गदर्शन करताना सत्यजित गुजर बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा, शिवाजी फुले, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, किशोर पाठक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभागीय वनाधिकारी(वन्यजीव) व्ही. एन. सातपुते म्हणाले की, वाघ हा सभ्य प्राणी आहे. तो मनुष्यावर हल्ला करीत नाही. बसलेल्या अवस्थेतील किंवा वाकलेल्या अवस्थेतील मनुष्यावर शिकार म्हणून तो हल्ला करू शकतो किंवा अस्तित्वाला धोका आहे याची शंका आल्यावरच तो हल्ला करतो. गौताळा अभयारण्यात ५० वर्षांनंतर वाघ आढळून आला असून, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. त्याचा अधिवास सुरक्षित राहावा यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याला शिकारीसाठी रानडुक्कर, निलगाय, हरीण यांची संख्या अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर आहे. जंगलात पाण्याची व्यवस्थाही असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक वनसंरक्षक राजेंद्र नाळे, आशा चव्हाण, वन्यजीव अभ्यासक आदिगुडे, वनपरिक्षेत्र अधिकारी(वन्यजीव)सागर ढोले, एस. आर. मोरे यांच्यासह कन्नड व नागद वन्यजीव विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : व्याघ्रदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्यजित गुजर यांनी मार्गदर्शन केले.
290721\img-20210729-wa0071.jpg
व्याघ्रदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सत्यजीत गुजर.