आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु- मिश्रा

By Admin | Published: September 13, 2014 11:11 PM2014-09-13T23:11:45+5:302014-09-13T23:28:00+5:30

भोकरदन: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदार संघात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी

Tight implementation of Model Code of Conduct: Mishra | आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु- मिश्रा

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु- मिश्रा

googlenewsNext


भोकरदन: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भोकरदन विधानसभा मतदार संघात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उल्लघंन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
भोकरदन मतदार संघासाठी २० सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. २७ सप्टेंबरला नामाकंन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून २९ रोजी छाननी व १ आॅक्टोंबर रोजी उमेवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचप्रमाणे १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून १९ अॉक्टोबर रोजी शासकिय विश्रामगृहासमोरील नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात मतमोजणी होईल. त्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. या मतदार संघात २ लाख ६४ हजार ११९ मतदार आहेत. यात पुरूष १ लाख ४० हजार ९२३ तर महिला १ लाख २३ हजार १९५ मतदार आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा यंदा ६ हजार मतदार वाढले आहेत. ज्या मतदारांचे नाव अद्याप यादीत नसेल किंवा काही नावात बदल झाला असेल अशा मतदारांसाठी १४ सप्टेंबर रोजी बी.एल.ओ.कडे नावाची नोंद करता येणार आहे. या मतदारांना सुध्दा या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार असल्याचे मिश्रा यांनी सागिंतले़ या मतदार संघात भोकरदन तालुक्यातील पाच महसूली मंडळाचा समावेश असून जाफ्राबाद तालुुक्यातील पाच महसूली मंडळातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. या मतदार संघात ३०० मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी १३ पथकाची स्थापना करण्यात आली. निवडणूक काळात कोठेही गरबड होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. आचासंहिता सुरू झाल्या पासुन गावा गावात सर्व पक्षाचे लावण्यात आलेले उदघाटनाचे फलक, बॅनर, तात्काळ काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी भोकरदनच्या तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रूपा चित्रक, जाफ्राबादचे तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार आऱजे़डोळे, एस़जी़ डोळस हे उपस्थित होते़
आ. चंद्रकांत दानवे यांच्या कार्यालयात शासकीय योजनांचे अर्ज वाटप केले जात असल्याची तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर पक्षाचे चिन्ह व पैशाचे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या. मिश्रा यांनी दोन्ही ठिकाणचे चित्रिकरण करून प्रकरण आचारसंहिता कक्षाकडे वर्ग केल्या आहेत. (वार्ताहर)
मतदार संघात ३०० मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी १३ पथकाची स्थापना करण्यात आली. निवडणूक काळात कोठेही गडबड होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.
या मतदार संघात २ लाख ६४ हजार ११९ मतदार आहेत. यात पुरूष १ लाख ४० हजार ९२३ तर महिला १ लाख २३ हजार १९५ मतदार आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा यंदा ६ हजार मतदार वाढले आहेत. ज्या मतदारांचे नाव अद्याप यादीत नसेल किंवा काही नावात बदल झाला असेल अशा मतदारांसाठी १४ सप्टेंबर रोजी बी.एल.ओ.कडे नावाची नोंद करता येणार आहे. मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मिश्रा यांनी यावेळी केले.

Web Title: Tight implementation of Model Code of Conduct: Mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.