टिळकपथ ५0 चा नव्हे, उरला फक्त २४ फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:25 AM2018-01-18T00:25:15+5:302018-01-18T00:25:24+5:30

कोट्यवधी रुपये खर्चून महानगरपालिकेने शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले. रुंदीकरणानंतर शहरातील प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची रुंदी वाढलेली असल्याचे मनपाच्या दप्तरी नोंद झाली. मात्र कागदोपत्री असलेली नोंद आणि प्रत्यक्षातील रस्ता यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचा अनुभव रोज वाहनचालकांना येतो. ही बाब लक्षात घेऊन लोकमतने चला रस्ता मोजूया हा उपक्रम हाती घेतला आहे.

Tilakpath is not 50, but only 24 feet | टिळकपथ ५0 चा नव्हे, उरला फक्त २४ फूट

टिळकपथ ५0 चा नव्हे, उरला फक्त २४ फूट

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षाचे परिणाम : फेरीवाले, हातगाड्या आणि वाहनांचे रस्त्यावर राजरोस अतिक्रमण

मुजीब देवणीकर/बापू सोळुंके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोट्यवधी रुपये खर्चून महानगरपालिकेने शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले. रुंदीकरणानंतर शहरातील प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची रुंदी वाढलेली असल्याचे मनपाच्या दप्तरी नोंद झाली. मात्र कागदोपत्री असलेली नोंद आणि प्रत्यक्षातील रस्ता यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचा अनुभव रोज वाहनचालकांना येतो. ही बाब लक्षात घेऊन लोकमतने चला रस्ता मोजूया हा उपक्रम हाती घेतला आहे. शहराची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया टिळकपथक ते गुलमंडी या रस्त्याची लोकमतने विविध तीन ठिकाणी मोजणी केली असता फेरीवाले, हातगाडीचालक आणि वाहन पार्किंगमुळे ५० फू ट रुंदीचा हा रस्ता प्रत्यक्ष वापरासाठी केवळ काही ठिकाणी १५ फूट तर काही ठिकाणी २४ फूट उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
पैठणगेट ते गुलमंडी या रस्त्याला टिळकपथ असे नाव आहे. तेथील कपडा मार्केटमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते. दिवाळी आणि ईदमध्ये तर या रस्त्याला जत्रेचे स्वरूप येते आणि पोलिसांना हा रस्ता वाहनांच्या रहदारीसाठी बंद करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण केले. रुंदीकरणानंतर या रस्त्याची रुंदी ५० फूट असल्याची नोंद मनपाच्या दप्तरी आहे. टिळकपथवरील दोन्ही बाजूच्या इमारतींचा वापर व्यावसायिक आहे. असे असताना टिळकपथवर खरेदीसाठी येणाºया ग्राहकांची वाहने पार्किंग करण्यासाठी एकाही व्यापाºयांनी पार्किंगची जागा सोडलेली नाही. परिणामी वाहनचालकांना रस्त्यावरच वाहने उभी करण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय व्यापारी आणि त्यांचे कर्मचारीही दुकानासमोर वाहने (पान २ वर)
रस्ता केला वन-वे...
५० फूट रुंदीच्या टिळकपथवर दुहेरी वाहतूक होणे अपेक्षित आहे. मात्र, वाहनांच्या पार्किंग आणि रस्त्यावरील हातगाड्यांमुळे रहदारीसाठी रस्ता अत्यल्प राहिला. परिणामी तेथे होणारी सततची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा रस्ता वन- वे (एकेरी) केला. शिवाय रस्त्यावरील पार्किंगसाठीही सम आणि विषम दिवस ठरवून दिले.
४ कोटींचा गुळगुळीत रस्ता
पैठणगेट ते गुलमंडी आणि महात्मा फुले पुतळ्यापर्यंतचा रोड महापालिकेने गुळगुळीत केला. या रस्त्याच्या कामावर महापालिकेने तब्बल चार कोटी रुपये खर्च केले. हे काम करताना कंत्राटदाराने फुटपाथाचे कामच केले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजंूनी व्यापाºयांनी अत्यंत तत्परतेने पाच, दहा फूट अतिक्रमणे केली आहेत.
चला
रस्ता मोजूया!
लोकमतच्या प्रतिनिधींनी पैठणगेट ते मॅचवेल या दुकानांपर्यंत टिळकपथची तीन ठिकाणी रुंदी बुधवारी सायंकाळी टेप लावून मोजली. पैठणगेट येथे रस्ता २४ फूट तर पुढे काही अंतरावर केवळ ८ फूट तर बाराभाई ताजिया भागातही २५ फूट रुंदीचा रस्ता रहदारीसाठी मोकळा असल्याचे दिसून आले.

Web Title: Tilakpath is not 50, but only 24 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.