आतापर्यंत चौघांना फाशीची शिक्षा
By Admin | Published: August 19, 2016 12:31 AM2016-08-19T00:31:32+5:302016-08-19T01:02:26+5:30
शिरीष शिंदे , बीड कु्रर पद्धतीने खून करणाऱ्या घटनांचे गांभीर्य ओळखत न्यायालय न्यायदान करताना जराही संकोच न बाळगता आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतात हे सर्वश्रूत आहे
शिरीष शिंदे , बीड
कु्रर पद्धतीने खून करणाऱ्या घटनांचे गांभीर्य ओळखत न्यायालय न्यायदान करताना जराही संकोच न बाळगता आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतात हे सर्वश्रूत आहे. यामुळे पीडितांच्या कुटुंबियांना न्याय तर गैरकृत्य करणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होते. आतापर्यंत जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये चार आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, तिन्ही घटना महिलांवरील अत्याचाराच्या आहेत.
महिला, मुलीवर अत्याचार होण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. दिल्ली येथे निर्भया खून प्रकरण हे अतिशय कु्रर पद्धतीचे होते. त्यामुळे त्यातील सातही आरोपींना उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. कु्रर पद्धतीने खून करणाऱ्यांना शेवटी फाशीच झाली यावर गुरुवारी सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.
जिल्ह्यातील फाशीचे पहिले प्रकरण
जिल्हा न्यायालय जवळपास १९६० साली सुरु झाले. तालुक्यातील पाली येथे १९९० मध्ये एका तरूणाने पत्नीस चारित्र्याच्या संशयावरून क्रुर पद्धतीने खून करुन प्रेत पाली धरणात पोत्यात भरून फेकून दिले होते. तत्कालिन जिल्हा सरकारी वकील भाऊसाहेब जगताप यांनी बाजू मांडली. जिल्हा व सत्र न्यायालयाने पहिल्यांदा आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली होती.
दुसरी घटना गेवराई शहरातील
२००८ मध्ये सुनील दामोधर गायकवाड याने पत्नी संगीताच्या चारित्र्यावर संशय घेत कात्रीने ३५, तर मुलगा आकाश व मुलीच्या अंगावर २५ वार केले होते. सुदैवाने पूजा बचावली. तत्कालिन सरकारी वकील उपेंद्र करमाळकरांनी सादर केलेल्या पुराव्यावरुन तत्कालीन न्या. नितीन दळवी यांनी सुनीलला सरकारी फाशी सुनावली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
चोरंबा येथे अल्पवयीन मुलीचा व तिच्या आईचा खून झाला होता्र माजलगाव सत्र न्यायालयाचे न्या. एम.व्ही. मोराळे यांनी आरोपी कृष्णा रिड्डे व अच्युत चुंचे यांना बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी वकील अजय तांदळे यांनी अत्यंत जबाबदारीने हे प्रकरण हाताळले होते. संवेदनशील प्रकरणामुळे निकालाच्या काही दिवसाआधी त्यांना संरक्षण दिले गेले. उपअधीक्षक गणेश गावडे यांनी केलेला तपास व सरकारी वकील तांदळे यांनी मांडलेली भक्कम बाजू यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा झाली.