देशाची एकजूटता दाखवून देण्याची वेळ !

By Admin | Published: September 24, 2016 12:15 AM2016-09-24T00:15:59+5:302016-09-24T00:19:05+5:30

देशासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या या जवानांना लोकमत समूह आणि प्रोझोनतर्फे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोझोन मॉल येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

Time to demonstrate the unity of the country! | देशाची एकजूटता दाखवून देण्याची वेळ !

देशाची एकजूटता दाखवून देण्याची वेळ !

googlenewsNext

औरंगाबाद : काश्मीरमधील उरी येथील लष्करी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. देशासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या या जवानांना लोकमत समूह आणि प्रोझोनतर्फे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोझोन मॉल येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होऊन जवानांप्रती श्रद्धा व्यक्त करून देशाची एकजूटता दाखवून देण्याची ही वेळ असल्याची भावना स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सैनिकांमधून व्यक्त करण्यात आली.
देशवासीयांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हीच भावना समोर ठेवून जवानांप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी यावेळी शेकडो दीप, मेणबत्त्या प्रज्वलित केल्या जातील. यामध्ये प्रत्येक स्वाभिमानी भारतीयांना सहभागी होऊन शहिदांना अभिवादन करून देशाप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त करता येतील. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ, विविध संस्था, संघटना यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भावना व्यक्त करा
देशाच्या सीमेवरील ही घटना अनपेक्षित आहे, असे वाटत नाही. परंतु आज सीमेचे संरक्षण करण्याबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी लष्कर लागत आहे. त्या तुलनेत आवश्यक शस्त्र सामुग्री दिली जात नाही. डिफेन्सचे बजेट तुटपुंजे आहे. ते वाढले पाहिजे, जवान शहीद झाल्यानंतर प्रत्येक जण भावना व्यक्त करीत आहे; परंतु संयम ठेवून या भावना व्यक्त केल्या पाहिजे. सर्वसामान्यांनी एका आवाजात बोलले पाहिजे. -कर्नल (नि.)समीर राऊत
शहिदांना मानवंदना
नागरिकांनी एकजूट होऊन उभे राहिले पाहिजे. या घटनेनंतर भारतीय लष्कर उत्तर द्यायला समर्थ आहे. देशाच्या सीमेवर लढणारे जवान सदैव आपल्या हृदयात राहिले पाहिजे. सीमेवर लढताना केवळ कुटुंबियांच्या देखभालीचे वचन ते देशवासीयांकडून मागत असतात. त्यासाठीही नागरिकांनी पुढे आले पाहिजे. केवळ १५ आॅगस्ट व २६ जानेवारी रोजी देशाप्रती भावना व्यक्त करता कामा नये. शहिदांना मानवंदना देऊन त्यांचा कायम आदर केला पाहिजे.
-जसवंतसिंग, अध्यक्ष, मातृभूमी संस्था
राष्ट्रभक्तीचा
संस्कार रुजवा
दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमधील देशभक्तीच्या भावना समोर येत आहेत. इतर संस्कारांप्रमाणे मुलांमध्ये राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजविला पाहिजे. सीमेवर असलेल्या जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे.
-राजेश भोसले पाटील, संस्थापक, डिफेन्स करिअर ज्युनिअर कॉलेज
लोकांनी पुढे यावे
दहशतवादी हल्ल्याच्या घटना वारंवार होत आहेत. एकप्रकारे त्याची परंपराच लागली आहे. त्यामुळे याविषयी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. इतर वेळी नागरिक जमतात. परंतु देशाच्या सीमेवर संरक्षण करताना जवान शहीद झाले. याचाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. लोकांनी त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला पाहिजे.
-ताराबाई लड्डा,
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी
सलाम शहिदांना : शहीद जवानांना ‘लोकमत’समूह आणि प्रोझोनतर्फे रविवारी श्रद्धांजली

Web Title: Time to demonstrate the unity of the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.