'काळ आला होता...'; टायर फुटल्याने दोन बसच्या धडकेत प्रवाशी बालंबाल बचावले, एक चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 02:20 PM2021-06-24T14:20:34+5:302021-06-24T14:23:23+5:30

An accident between two ST buses due to tire burst in Aurangabad :बसचे समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले

'The time had come ...'; A passenger was safely rescued in a collision between two ST buses when a tire burst, injuring one driver | 'काळ आला होता...'; टायर फुटल्याने दोन बसच्या धडकेत प्रवाशी बालंबाल बचावले, एक चालक जखमी

'काळ आला होता...'; टायर फुटल्याने दोन बसच्या धडकेत प्रवाशी बालंबाल बचावले, एक चालक जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद-रावेर आणि जळगाव-पुणे या बसची समोरसमोर धडक

सिल्लोड ( औरंगाबाद ) : औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर  माणिकनगर (भवन) जवळ एका पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता दोन बस समोरासमोर धडकल्या. औरंगाबादहून येणाऱ्या औरंगाबाद-रावेर बसचे समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ती बस समोरून सिल्लोडहून येणाऱ्या जळगाव-पुणे बसवर जाऊन धड़कली. या अपघातात एक बस चालक गंभीर जखमी झाला असून दोन्ही बसमधील सर्व  प्रवासी सुदैवाने बचावले. ( collision between two ST buses near Sillod due to tire burst )  

या अपघातात रावेर बसचा  चालक मोसीन शेख  ( 40 वर्ष रा. फैजपुर ) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना सिल्लोड येथील  उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही  बस मधील इतर प्रवाशांना मार लागला नाही  नाही. या अपघाताची माहिती मिळताच सिल्लोड आगार प्रमुख आनंद चव्हाण, लेखाकार कॄष्णा कावले, वाहतूक नियंत्रक रंगराव भोटकर, सरफराज पठाण, लिपिक बाबूराव पंडित यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस व नागरिकांनी वाहतूक सुरळीत केली. दोन्ही अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना इतर बसमधून प्रवासात रवाना केले. या प्रकरणी पुढील तपास   सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पोलिस जमादार दादाराव पवार करत आहे.

Web Title: 'The time had come ...'; A passenger was safely rescued in a collision between two ST buses when a tire burst, injuring one driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.