घाटीत लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना उचलून नेण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:02 AM2020-12-24T04:02:26+5:302020-12-24T04:02:26+5:30
बस बांधणीच्या श्रमिक तासांत कपात औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणीच्या श्रमिक तासांत कपात करण्याचा निर्णय घेण्यात ...
बस बांधणीच्या श्रमिक तासांत कपात
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणीच्या श्रमिक तासांत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ११७६ वरून ७०० श्रमिक तास करण्यात येणार आहे. मात्र, यास संघटनांकडून विरोध केला जात आहे. किमान १ हजार श्रमिक तास करण्याची मागणी होत आहे.
‘आरटीओ’च्या कामासाठी
३ ठिकाणी जाण्याची वेळ
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाकडून करोडी येथे फिटनेसचे काम केले जात आहे. पर्मनंट लायसन्ससाठी मोकळ्या जागेत, रस्त्यावर चाचणी घेतली जाते. लर्निंग लायसन्ससाठी विविध कामे रेल्वेस्टेशन परिसरातील कार्यालयात होतात. वाहनधारकांना ३ वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत आहे.
जिल्हा रुग्णालयात
पुन्हा वाढले रुग्ण
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या २९ पर्यंत आली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत ही संख्या ४१ वर पोहोचली आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांसाठी ३०० खाटांची व्यवस्था आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत घसरण झाली होती.
एसटी कर्मचाऱ्यांना
मिळेल स्वच्छ पाणी
औरंगाबाद : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल, यासाठी नियोजन केले जात आहे. यासाठी वॉटर प्युरिफायरची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच शुद्ध, स्वच्छ पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.