जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:07 AM2018-05-31T00:07:53+5:302018-05-31T00:09:29+5:30
जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा मनमोकळा वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केले तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा शिल्लक राहू शकेल आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तरच ते सर्वांना उपलब्ध होऊ शकेल, अशा शब्दांत पालखेडच्या महिला सरपंच वर्षा जाधव यांनी सखींना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा मनमोकळा वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केले तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा शिल्लक राहू शकेल आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तरच ते सर्वांना उपलब्ध होऊ शकेल, अशा शब्दांत पालखेडच्या महिला सरपंच वर्षा जाधव यांनी सखींना मार्गदर्शन केले. लोकमत सखी मंचसाठी आयोजित रिन आणि लोकमत प्रस्तुत ‘जल उत्सव’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
लोकमत हॉल, लोकमत भवन येथे मंगळवारी सायंकाळी सखी मंचच्या सदस्यांसाठी, तसेच वाचक महिलासांठी जल उत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच वर्षा जाधव, कलाकार संदीप पाटील आणि सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
याप्रसंगी बोलताना जाधव यांनी पालखेड गावात जलसंवर्धनासंदर्भात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, २०१५ साली गावात ट्रँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा तरीही पाणी पुरायचे नाही.
पाण्याचे हे भीषण संकट पाहून त्यांनी जलयुक्त शिवार-माथा ते पायथा, शोषखड्डे, वॉटर कप, विहीर आणि आड गाळमुक्त करणे, असे अनेक उपक्रम राबविले आणि या सर्व योजनांचा परिपाक म्हणजे सध्या गावातील नाले, आड, विहिरी भरलेल्या असून, यंदाच्या उन्हाळ्यात एकही टँकर मागवावे लागले
नाही.
जाधव यांनी गावात धोबीघाट बांधले असून, याच ठिकाणी महिला क पडे धुण्यासाठी येतात. या धोबीघाटाचे पाणी शोष खड्ड्यात जमा केले जाते. यासोबतच गावात ठिकठिकाणी शोषखड्डे बांधले असून, गावकऱ्यांनी आपापल्या घरी रेन वॉटर हावेस्ंिटग करून घ्यावे, याबाबतही त्या आग्रही आहेत.
या कार्यक्रमात महिलांना रिनच्या मदतीने पाणी बचत करणे कसे शक्य आहे, यासंबंधी माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफीतही दाखविण्यात आली. कार्यक्र माच्या अखेरीस प्रत्येक सखीने जलसंवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली.
घोषवाक्य, पोस्टर स्पर्धेतील विजेते
जल उत्सवानिमित्त सखींसाठी ‘पाणी बचत’ या विषयावर घोषवाक्य व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. घोषवाक्य स्पर्धेत अलका निघोटे, शारदा जाधव, उषा ताडलिंभेकर यांनी बाजी मारली तर अंजली निंबेकर, पल्लवी शेटे, कल्पना काळवणे, नीलिमा आचार्य या पोस्टर स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या.
पुढील पिढीसाठी पाण्याचे जतन करावे लागेल
पाण्याचे महत्त्व सांगताना वर्षा जाधव म्हणाल्या की, ज्याप्रमाणे आपण पुढील पिढीसाठी संपत्ती जमा करून ठेवतो, त्याचप्रमाणे आता पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून ते पुढील पिढीसाठी जतन करून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. गावात महिलांसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यांना पाणी बचतीविषयी नियमित मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
म्युझिकल गेम शोची धमाल
जल उत्सव कार्यक्रमात पुणे येथील कलाकार संदीप पाटील यांनी म्युझिकल गेम शो सादर केला. यात सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भरपूर बक्षिसे जिंकली.