अनुदान रखडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
By Admin | Published: March 2, 2016 11:12 PM2016-03-02T23:12:23+5:302016-03-02T23:18:07+5:30
सितम सोनवणे , लातूर लातूर जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागा अंतर्गत १०७ अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह चालविण्यात येत आहेत़ यातील ९३ योजनेत्तर वसतिगृहाचा तब्बल ६
सितम सोनवणे , लातूर
लातूर जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागा अंतर्गत १०७ अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह चालविण्यात येत आहेत़ यातील ९३ योजनेत्तर वसतिगृहाचा तब्बल ६ महिन्याचा निधी मिळाला नसल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था उधारी- उसणवारीवर करण्यात येत आहे़परिणामी वसतिगृह आणि कर्मचाऱ्याचे हाल होत असून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़
लातूर जिल्ह्यातील १०७ अनुदानित मागसवर्गीय वसतिगृह सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालविण्यात येत आहे़ यातील १२ वसतिगृह योजने अंतर्गत आहेत़ तर दोन वसतिगृह विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी आहेत़ या १४ वसतिगृहाला नियमित निधी दिला जातो़ पण योजनेत्तर ९३ वसतिगृहाला आॅगस्ट पर्यंतचे अनुदान प्राप्त झाले होते़ पण आॅगस्ट २०१५ नंतर तब्बल सहा महिन्यापासून शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही़ त्यामुळे वसतिगृहाचे इमारत भाडे, विद्यार्थ्याचे भोजन अनुदान आणि कर्मचाऱ्याचे मानधन असे एकूण कोट्यवधी रुपयाचे अनुदान थकले आहे़ विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी व्यवस्थापकांना उसणवारी करावी लागत आहे़
त्यातच जिल्ह्यात आसलेली तीव्र पाणी टंचाई मुळे अनेक वसतिगृहासाठी पाणी टँकरच्या माध्यमातून विकत घ्यावे लागत आहे़ सहामहिन्याचे अनुदान थकल्यामुळे या वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे़ सुरवातीच्या काळात शेजारी- आप्त नातवाईकांनी आर्थिक मदत केली़ पण तिसऱ्या महिन्यापासून सर्वानी मदतीचा हात आखडला़ दुष्काळी परिस्थितीमुळे ज्यांनी मदत केली त्यांनी दिलेली मदतीची परत मागणी केली आहे़ भाड्यानी असलेल्या वसतिगृह व्यवस्थापकांना मालकांचा भाड्यासाठी तगादा सुरू आहे़ अशा तणावग्रस्त परिस्थितीत व्यवस्थापक आणि कर्मचारी आहेत़