फळपीक विम्यासाठी आॅक्टोबरअखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:06 AM2017-10-02T00:06:55+5:302017-10-02T00:06:55+5:30

प्रतिकूल हवामानापासून फळपिकांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पेरु आदी पिकांना लागू असून जिल्ह्यातील फळपिकांचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना ३१ आॅक्टोबरपर्यंत या पिकांचा विमा काढता येणार आहे.

Timelimit for fruit insurance | फळपीक विम्यासाठी आॅक्टोबरअखेरची मुदत

फळपीक विम्यासाठी आॅक्टोबरअखेरची मुदत

googlenewsNext

जालना : प्रतिकूल हवामानापासून फळपिकांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पेरु आदी पिकांना लागू असून जिल्ह्यातील फळपिकांचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना ३१ आॅक्टोबरपर्यंत या पिकांचा विमा काढता येणार आहे.
कमी, जास्त पाऊस, वेगाचा वारा आदी धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधित शेतकºयांना विमा संरक्षण व अर्थसाहाय्य देणे, फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, ही या योजनेची मुख्य उद्देश आहे. तालुक्यातील महसूल मंडळासाठी निर्धारित केलेल्या फळ पिकांनाच सदर योजना लागू असणार आहे. महसूल मंडळात महावेधद्वारे स्थापन करण्यात आलेली हवामान केंद्रांची आकडेवाडी यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या महसूल मंडळात हवामान केंद्र नाही, अशा ठिकाणी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेच्या हवामान केंद्राच माध्यमातून हवामानाच्या आकडेवारीची नोंद घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील शेतक-यांनी आपल्या महसूल मंडळासाठी लागू असलेल्या मोसंबी, पेरु डाळिंब (आंबिया बहार) व केळी या फळ पिकांचा विमा ३१ आॅक्टोबरपर्यंत तर द्राक्षांचा विमा १५ आॅक्टोबरपर्यंत काढून घ्यावा. तसेच आंब्याचा विमा ३१ डिसेंबरपर्यंत बँकेच्या माध्यमातून काढून घ्यावा, अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शेतकºयांनी आपल्या महसूल मंडळासाठी लागू असलेल्या फळपिकाचा विम्याची माहिती कृषी विभागाकडून करून घ्यावी. त्यानंतर आपल्याकडील फळपिकांचा विमा वेळेत बँकेत भरावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी केले आहे.
द्राक्षासाठी या महसूल मंडळांचा समावेश
द्राक्ष फळपिकासाठी जालना तालुक्यातील वाघु्रळ जहांगीर, जालना ग्रामीण, रामनगर, पाचनवडगाव, जालना शहर, नेर, सेवली, विरेंगाव या मंडळांचा समावेश आहे. बदनापूर तालुक्यातील बदनापूर, शेलगाव, रोषणगाव, बावणेपांगरी या मंडळातील शेतक-यांना द्राक्ष विम्यासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे.
मोसंबीसाठी...
मोसंबीसाठी जालना तालुक्यातील जालना शहर व ग्रामीण, रामनगर, नेर, विरेगाव, पाचनवडगाव, वाघु्रळ जहाँगीर, सेवली. भोकदरन, सिपोरा, हसनाबाद राजूर, केदरखेडा, सिरोपा बाजार, पिंपळगाव रेणुकाई, बदनापूर, सेलगाव, दाभाडी, बावणेपांगरी, रोषणगाव, अंबड, धनगरपिंप्री, रोहिलागड, वडीगोद्री, गौंदी, सुखापुरी, घनसावंगी, राणीऊंचेगाव, कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी, आंतरवाली टेंभी, जांबसमर्थ रांजणी, परतूर, वाटूर, सातोना, श्रीष्टी, आष्टी, सातोना बू., मंठा, पांगरीगोसावी, तळणी, ढोकसाळ या महसूल मंडळांचा समावेश आहे.

 

Web Title: Timelimit for fruit insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.