शैक्षणिक संस्थांच्या परिसरातच तंबाखूजन्य पदार्थ विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 06:54 PM2019-01-23T18:54:42+5:302019-01-23T18:54:46+5:30
अन्न व औषध प्रशासन, गुन्हे शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण पथकाने मंगळवारी संयुक्त मोहीम राबवून शैक्षणिक संस्थांच्या परिसरात २४ विक्रे त्यांवर कारवाईचा बडगा उगारत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.
औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासन, गुन्हे शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण पथकाने मंगळवारी संयुक्त मोहीम राबवून शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (नियंत्रण) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २४ विक्रे त्यांवर कारवाईचा बडगा उगारत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, डॉ. पुष्कर दहिवाळ, योगेश सोळुंके, लक्ष्मीकांत माळगे, विजय इंगळे, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, योगेश कणसे, सुलक्षणा जाधवर आणि गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख व त्यांच्या सहकाºयांनी घाटी परिसर, विद्यापीठ गेट, टाऊन हॉल आणि औरंगपुरा परिसरात एकाचवेळी कारवाई करून २४ पानटपरी चालक व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली.
कारवाईने टप-या बंद
कारवाईची माहिती पसरल्याने शहरातील बहुतांश पानटपºया बंद झाल्या. अशा प्रकारची मोहीम नियमित राबवली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद शाह व तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड यांनी कळविले आहे.