आजपासून ५० बसेस रस्त्यावर धावतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:05 AM2021-01-13T04:05:31+5:302021-01-13T04:05:31+5:30

औरंगाबाद : राज्य शासनाने केलेल्या अनलॉकअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात शहर बससेवा सुरू करण्याची मुभा महापालिकेला दिली. पहिल्या टप्प्यात २७ बसेस ...

From today, 50 buses will run on the road | आजपासून ५० बसेस रस्त्यावर धावतील

आजपासून ५० बसेस रस्त्यावर धावतील

googlenewsNext

औरंगाबाद : राज्य शासनाने केलेल्या अनलॉकअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात शहर बससेवा सुरू करण्याची मुभा महापालिकेला दिली. पहिल्या टप्प्यात २७ बसेस शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावत होत्या. ११ जानेवारीपासून शहरात नवीन २० मार्गांवर एकूण ५० स्मार्ट शहर बस धावणार आहेत.

शहर वाहतूक बससेवेला काही दिवसांपासून मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. किलोमीटर मागे ६३ रुपये आर्थिक तूट सहन करावी लागत आहे. स्मार्ट सिटीला प्राप्त निधीतून ही बससेवा सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाने उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात फारसे यश आलेले नाही. सोमवारपासून २३ नवीन बसेस पूर्वीप्रमाणे शहरातील रस्त्यांवर धावणार आहेत. शहर बसची संख्या आता ५० पर्यंत पोहोचणार आहे.

नवीन मार्ग खालीलप्रमाणे राहतील :

रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंट मार्गे - शासकीय तंत्रनिकेतन, सूतगिरणी चौक, पुंडलिकनगर, सिडको

औरंगपुरा ते रांजणगाव मार्गे - मध्यवर्ती बसस्थानक

सिडको ते घाणेगाव मार्गे - रांजणगाव, मायलन. सिडको ते विद्यापीठ मार्गे - औरंगपुरा, लक्ष्मी कॉलनी.

सिडको ते रेल्वे स्टेशन- मार्गे - सेव्हन हिल, छत्रपती शिवाजीनगर, बायपास. सिडको ते बजाजनगर-

मार्गे - सिडको महानगर १, वडगाव कोल्हाटी.

रेल्वे स्टेशन ते रेल्वे स्टेशन -मार्गे - सेव्हन हिल, सेंट्रल नाका, चिश्तीया पोलीस चौकी, बजरंग चौक, एम २, टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर, शहागंज, मध्यवर्ती बसस्थानक. सिडको ते औरंगपुरा - मार्गे - एम २, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानक, सावरकर चौक. मध्यवर्ती बसस्थानक ते करमाड -मार्गे - सिडको बसस्थानक, चिकलठाणा, शेंद्रा, लाडगाव. यासोबतच विद्यार्थी पासेस आणि विविध सवलती योजनांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सिडको बसस्थानक, औरंगपुरा आणि रेल्वे स्टेशन येथे पास विक्री केंद्र सुरू आहे.

Web Title: From today, 50 buses will run on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.