आज ५२ फुटी रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:58 PM2017-09-29T23:58:49+5:302017-09-29T23:58:49+5:30

येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ३० सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता रावण दहन केले जाणार आहे. रावण दहनाची मागील १६३ वर्षांची परंपरा आहे. रावण दहन पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी होते.

Today 52 Feet Rawan Combustion | आज ५२ फुटी रावणाचे दहन

आज ५२ फुटी रावणाचे दहन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ३० सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता रावण दहन केले जाणार आहे. रावण दहनाची मागील १६३ वर्षांची परंपरा आहे. रावण दहन पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी होते.
हिंगोली येथील रामलीला मैदानावर दरवर्षी मोठ्या उत्साहात सार्वजनिक दसरा महोत्सव साजरा केला जातो. मागील तीन दिवसांपासून दसरा प्रदर्शनात नागरिकांची गर्दी वाढली आहे. रामलीला मैदानावर भरविण्लेल्या दसरा महोत्सवात विविध प्रकारची दुकाने, तसेच आकाश पाळणे यासह विविध दुकाने थाटली आहेत. बच्चे कंपनीसाठी दसरा प्रदर्शनीमध्ये विविध आकर्षक असे पाळणे सर्वांचे आकर्षण ठरत आहेत.
रावण दहनातील आतषबाजी पाहण्यास गर्दी होत असते. त्यामुळे दसरा महोत्सवात पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी गैरप्रकार करताना कोणी आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दसरा महोत्सवात आठ पोलीस अधिकारी, दीडशे कर्मचारी तसेच ८० होमागार्ड यासह राज्य रखीव बलगट असा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त सर्व पोलीस ठाण्यांचा कारभार सांभाळण्याची धुरा महिला अधिकाºयांवर सोपविली आहे.

Web Title: Today 52 Feet Rawan Combustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.