इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे आज भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:22 AM2017-10-16T01:22:46+5:302017-10-16T01:22:46+5:30

सीएमआयएच्या ब्राऊनफील्ड देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा.लि.चा भूमिपूजन समारंभ सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वा. होत आहे

 Today the inauguration of electronic cluster | इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे आज भूमिपूजन

इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे आज भूमिपूजन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सीएमआयएच्या ब्राऊनफील्ड देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा.लि.चा भूमिपूजन समारंभ सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वा. होत आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. चंद्रकांत खैरे, खा. रावसाहेब दानवे यांची उपस्थिती राहणार आहे. मराठवाड्यातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उद्योगांचा तसेच भविष्यात येणा-या उद्योगाचा विचार करून इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर निर्माण करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारला जाणार असून, यामध्ये १७ कोटी ५४ लाखांची उपकरणे-यंत्रसामग्री असेल. केंद्र शासनाकडून ७५, राज्य शासनाकडून १०, तर स्थानिक उद्योजकांकडून १५ टक्के निधी उभारला जाईल. सिस्टिम डिझाइन व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेंद्रा औद्योगिक परिसरात हे क्लस्टर उभारण्यात येणार आहे.
देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा.लि. या क्लस्टरच्या बांधकामानंतर मराठवाड्यातील सुमारे ५० लघु
व मध्यम उद्योगांना फायदा होईल, असा दावा सीएमआयने केला
आहे.

Web Title:  Today the inauguration of electronic cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.