राज ठाकरे शहरात, ‘औरंगाबाद व्हिजन’वर आज परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:49 AM2018-08-30T00:49:45+5:302018-08-30T00:50:32+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’वर परिसंवाद होणार असून ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Today in Raj Thackeray's city, 'Aurangabad Vision' seminar | राज ठाकरे शहरात, ‘औरंगाबाद व्हिजन’वर आज परिसंवाद

राज ठाकरे शहरात, ‘औरंगाबाद व्हिजन’वर आज परिसंवाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’वर परिसंवाद होणार असून ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईहून सायंकाळी ५.३० वाजता चिकलठाणा विमानतळावर राज ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अमोल खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विमानतळापासून जालना रोडवरील हॉटेलपर्यंत वाहन रॅली काढण्यात आली. राज ठाकरे यांनी सायंकाळी पदाधिकाºयांची बैठक घेऊन संवाद साधला.
महिनाभरात दुसºयांदा ते मराठवाड्याच्या दौºयावर आले असून, गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता पक्ष प्रवेश सोहळा, पदाधिकारी बैठक, नवीन नियुक्त्या आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता शहरातील एका हॉटेलमध्ये ‘औरंगाबाद व्हिजन’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील २०० लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
शहरात १९ जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर टीका केली होती. कचºयाच्या प्रश्नावरून त्यांनी औरंगाबाद महापालिकेचाही चांगलाच समाचार घेतला होता. औरंगाबादेत ज्यांच्या हातात २५ ते ३० वर्षे सत्ता दिली, त्यांच्याकडून कचºयाचे नियोजन झाले नाही. शहर वाढण्याऐवजी बकाल होत आहे. महापालिका खाऊन फक्त रिकामी करण्यासाठी नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
मनसेचे औरंगाबाद लक्ष्य
शिवसेनेतील गटबाजी आणि अपमानास्पद वागणुकीमुळे काही जण मनसेकडे आकर्षित झाल्याचे कळते. यामध्ये काही माजी नगरसेवक, पदाधिकारी मनसेमध्ये जाण्याच्या वाटेवर आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांचे ‘व्हिजन औरंगाबाद’च्या माध्यमातून येथील राजकारण ताब्यात घेण्याचे नियोजन असल्याचे समजते. त्यामुळे गेल्या महिनाभरात दुसºयांदा ते औरंगाबादेत दाखल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Today in Raj Thackeray's city, 'Aurangabad Vision' seminar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.