आज सरपंच अवॉर्ड सोहळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:21 AM2018-01-11T00:21:14+5:302018-01-11T00:21:22+5:30

लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा गुरुवार, दि़ ११ रोजी सकाळी १० वा. मातोश्री लॉन्स, अंबड रोड जालना येथे रंगणार आहे़

Today sarpanch award ceremony! | आज सरपंच अवॉर्ड सोहळा!

आज सरपंच अवॉर्ड सोहळा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा गुरुवार, दि़ ११ रोजी सकाळी १० वा. मातोश्री लॉन्स, अंबड रोड जालना येथे रंगणार आहे़ पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, यांच्या उपस्थितीत आदर्श सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे़
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधून आलेल्या प्रस्तावांमधून विविध तेरा कॅटेगरींमध्ये सरपंचांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे़ ‘लोकमत’च्या तज्ज्ञ ज्युरी मंडळाने कठोर परीक्षण केले आहे़
या पुरस्कार सोहळ्याचे गावोगावच्या सरपंचांना निमंत्रण देण्यात आले आहे़ ज्या सरपंचांनी पुरस्कारासाठी नामांकने दाखल केली आहेत त्यांनी तसेच ज्यांनी प्रस्ताव पाठविलेले नाहीत, अशा सर्वांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे़ या सोहळ्यात गावखेड्यांच्या बदलाची कहाणी उपस्थितांसमोर मांडली जाणार आहे़
गावाचा विकास करूपाहणा-या गावांसाठी प्रेरणादायी असा हा सोहळा असणार आहे़ बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक असून, औरंगाबाद प्लँटचे के. वेंकटरमण (सह उपाध्यक्ष), यशवंत विधाते (वरिष्ठ डीजीएम), जुबेर शेख (सह व्यवस्थापक), नेत्रानंद अंबाडेकर (एरिया मॅनेजर), ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. त्यांच्यातर्फे आनंद दुलारिया, अजित मुळे, अध्यक्ष महाराष्ट्र बियाणे उत्पादक संघटना यांची उपस्थिती राहणार आहे. या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद
मिळाला.
जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या अकरा कॅटेगरीतील पुरस्कारांसोबतच ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाºया सरपंचांना ‘सरपंच आॅफ द इयर’ पुरस्कारांनी गौरविण्यात येईल.

Web Title: Today sarpanch award ceremony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.