जायकवाडी धरणातून आज पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 09:03 PM2017-09-21T21:03:11+5:302017-09-21T22:05:57+5:30

जायकवाडी धरणातून २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता १० हजार क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारी जायकवाडी प्रशासनाने घेतला.

Today the water will leave from Jayakwadi dam | जायकवाडी धरणातून आज पाणी सोडणार

जायकवाडी धरणातून आज पाणी सोडणार

googlenewsNext
ठळक मुद्देधरण ९७ टक्क्यांवर

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणातून  २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता १० हजार क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारी जायकवाडी प्रशासनाने घेतला.
गुरुवारी जलसाठ्याने ९७ ही टक्केवारी ओलांडली होती. गुरुवारी सायंकाळी धरणाची  पाणीपातळी १५२१ फूट झाली होती. यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त एक फूट राहिले आहे. धरणात एकूण जलसाठा २७८९.६३० दलघमी, तर उपयुक्त जलसाठा २०५१.५१४ दलघमी झाला आहे. धरणात ७९४३० क्युसेक क्षमतेने आवक सुरू असल्याने सकाळपर्यंत धरण काठोकाठ भरणार आहे. आवक लक्षात घेता शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय जायकवाडीचे अधीक्षक अभियंता तांदळे व मुख्य अभियंता स्वामी यांनी घेतला, अशी माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
जायकवाडी धरणाच्या मुक्तपाणलोट क्षेत्रात येणाºया अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यातच औरंगाबाद येथे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात गुरुवारी सायंकाळी ७९४३० क्युसेक एवढ्या मोठ्या क्षमतेने आवक सुरू होती. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणसमुहातील विसर्ग गुरुवारी घटविण्यात आले आहे. भंडारदरा धरणातून फक्त ८०१ क्युसेक, दारणा धरणातून ११०० क्युसेक, गंगापूर (नाशिक) धरणातून ११०६ क्युसेक विसर्ग ठेवण्यात आले आहेत, नांदूर मधमेश्वर बंधाºयातून ३१५५ क्युसेक गोदावरीत व ओझरवेअर बंधाºयातून ५०४५ क्युसेक पाणी प्रवरेत विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे उर्ध्व भागातून येणारी आवक घटणार असली तरी स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाºया औरंगाबाद, कोपरगाव, शिर्डी, नेवासा, राहुरी, अमरापूर, लोणी, आदी भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार सुरू असल्याने हे पाणी गतीने जायकवाडी धरणात जमा होत आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी गतीने वाढत आहे.
जायकवाडीलगतच्या तालुक्यात अतिवृष्टी
जायकवाडी धरणाच्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, नेवासा, शेवगाव, कोपरगाव, शिर्डी, राहुरी, आदी तालुक्यात बुधवारी तुफान अतिवृष्टी झाली. श्रीरामपूर १६३ मि. मी., लोणी ११४ मि.मी., राहुरी १४१ मि.मी., अमरापूर ६५ मि.मी., नेवासा २४ मि. मी., कोपरगाव ४८ मि. मी., नागमठान ५२ मि.मी. पावसाची नोंद झाली.  

 

Web Title: Today the water will leave from Jayakwadi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.