‘लोकमत’च्या वतीने आज ‘शिक्षण सेवा गौरव’ पुरस्काराचे वितरण
By Admin | Published: September 9, 2015 12:05 AM2015-09-09T00:05:47+5:302015-09-09T00:05:47+5:30
बीड : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील संस्था व व्यक्तींचा आज ‘लोकमत’च्या वतीने ‘शिक्षण सेवा गौरव २०१५’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
बीड : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील संस्था व व्यक्तींचा आज ‘लोकमत’च्या वतीने ‘शिक्षण सेवा गौरव २०१५’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात अनेकांनी आपले आयुष्य झोकून दिले. त्यामुळेच आज बीडचे नाव शिक्षण क्षेत्रात अव्वल आहे. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा ‘शिक्षण सेवा गौरव’ देऊन सन्मान करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी शशीकांत हिंगोणेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश गावडे पाटील, ‘लोकमत’चे उपाध्यक्ष संदीप विष्णोई, संपादक सुधीर महाजन यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमासाठी असणार आहे. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन संस्था व व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बुधवारी दुपारी तीन वाजता हॉटेल अन्विता, जालना रोड येथे पार पडणार आहे. (प्रतिनिधी)