राज्यभरात अन्नदात्यासाठी आज अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:31 PM2019-03-18T23:31:38+5:302019-03-18T23:32:57+5:30

: विदर्भातील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांनी १९ मार्च १९८६ रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केली होती. यापासून सुरू झालेल्या आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. या दिनाला अन्नदात्याचे स्मरण व्हावे, त्यांच्या समस्यांना वाचा फुटावी यासाठी शेतकरी नेते अमर हबीब यांनी साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे आंदोलन तीन वर्षांपासून सुरू केले आहे. यावर्षीही राज्यातील विविध भागांसह दिल्लीत एक दिवसाचा उपवास करण्यात येणार आहे.

Today's Food Struggles Movement | राज्यभरात अन्नदात्यासाठी आज अन्नत्याग आंदोलन

राज्यभरात अन्नदात्यासाठी आज अन्नत्याग आंदोलन

googlenewsNext



औरंगाबाद : विदर्भातील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांनी १९ मार्च १९८६ रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केली होती. यापासून सुरू झालेल्या आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. या दिनाला अन्नदात्याचे स्मरण व्हावे, त्यांच्या समस्यांना वाचा फुटावी यासाठी शेतकरी नेते अमर हबीब यांनी साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे आंदोलन तीन वर्षांपासून सुरू केले आहे. यावर्षीही राज्यातील विविध भागांसह दिल्लीत एक दिवसाचा उपवास करण्यात येणार आहे. औरंगाबादेतही मराठवाडा साहित्य परिषदेच्या परिसरात मंगळवारी (दि.१९) सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उपोषण करण्यात येणार आहे. या उपवास आंदोलनात शेतकरी पुत्रांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजक डॉ. राम चव्हाण, अ‍ॅड. महेश भोसले आदींनी केले आहे.

Web Title: Today's Food Struggles Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.