लायन्सची बहुप्रांतीय परिषद आजपासून
By Admin | Published: August 19, 2016 01:02 AM2016-08-19T01:02:02+5:302016-08-19T01:04:54+5:30
औरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या बहुप्रांतीय नवीन कार्यकारिणीची पहिली परिषद १९ ते २१ आॅगस्टदरम्यान शहरात होत आहे. २०१६-१७ हे लायन्सचे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या बहुप्रांतीय नवीन कार्यकारिणीची पहिली परिषद १९ ते २१ आॅगस्टदरम्यान शहरात होत आहे. २०१६-१७ हे लायन्सचे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे.
यासंदर्भात बहुप्रांत सचिव एम. के. अग्रवाल यांनी सांगितले की, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या बहुप्रांत ३२३ मध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात व छत्तीसगढ राज्यांचा समावेश होतो. या बहुप्रांतीय परिषदेत ५ राज्यांतील १५० लायन्स पदाधिकारी सहभागी होणार आहेत. रामा इंटरनॅशनल येथे तीनदिवसीय परिषदेचे उद्घाटन १९ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता होणार आहे. परिषदेला ‘रिथम’१६ सेंटत्रिअल लीडर्स मीट’ असे नाव देण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मुकुंद भोगले तर अध्यक्षपदी बहुप्रांतीय अध्यक्ष राजेंद्र भट्ट (बडोदरा) यांची उपस्थिती राहणार आहे. माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अशोक मेहता (मुंबई), आंतरराष्ट्रीय निर्देशक अरुणा ओसवाल (नवी दिल्ली), माजी निर्देशक नरेंद्र भंडारी (पुणे), प्रवीण छाजेड (अहमदाबाद), प्रेमचंद बाफना (पुणे) यांची विशेष उपस्थिती, तसेच माजी अध्यक्ष कुलभूषण मित्तल (इंदोर), उपाध्यक्ष ललिता मेहता, कोषाध्यक्ष राजेंद्र गर्ग यांच्यासह सर्व प्रांताचे प्रांतीय नेतृत्व उपस्थित राहणार आहे. परिषद यशस्वीतेसाठी यजमान प्रांताचे प्रांतपाल प्रवीण अग्रवाल, संयोजक माजी प्रांतपाल डॉ.नवल मालू, संदीप मालू, डॉ.संजय बोरा, राजेश राऊत, तनसुख झांबड, महावीर पाटणी, अॅड.शांतीलाल छापरवाल आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.