विद्यापीठाच्या सिनेटसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:27 AM2017-10-29T00:27:55+5:302017-10-29T00:28:06+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधर मतदार संघातून १० प्रतिनिधी निवडण्यासाठी रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होत आहे़ या निवडणुकीत ज्ञानतीर्थ पॅनल, विद्यापीठ नवपरिवर्तन तसेच विद्यापीठ विकास मंच हे प्रमुख पॅनल उभे आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधर मतदार संघातून १० प्रतिनिधी निवडण्यासाठी रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होत आहे़ या निवडणुकीत ज्ञानतीर्थ पॅनल, विद्यापीठ नवपरिवर्तन तसेच विद्यापीठ विकास मंच हे प्रमुख पॅनल उभे आहेत़
नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातून दहा प्रतिनिधी अधिसभेवर निवडणून द्यावयाचे आहेत़ यामध्ये सर्वसाधारण गटातून पाच पदवीधरांना निवडून द्यावयाचे असून यागटामध्ये १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ महिला गटातून एक पदवीधर महिला निवडून द्यावयाची असून तीन उमेदवार उभे आहेत़ अनुसूचित जाती गटातील एका जागेसाठी सात उमेदवार उभे आहेत़ अनुसूचित जमाती गटातील एका जागेसाठी दोन उमेदवार उभे आहेत़ इतर मागासवर्गीय गटातील एका जागेसाठी चार उमेदवार निवडणूक लढवित आहेत़
नांदेड जिल्ह्यातील मतदान केंद्र पुढील प्रमाणे, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, प्रतिभा निकेतन महाविद्यालय, के़ आऱ एम़ महिला महाविद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, कंधार, पानसरे महाविद्यालय, अर्जापूर, शरदचंद्र महाविद्यालय, नायगाव, देगलूर महाविद्यालय, देगलूर, शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालय, मुखेड, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर, बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट़
ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकेंद्राध्यक्ष, निवडणूक अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ या निवडणुकीची मतमोजणी ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे़
या निवडणुकीसाठी १२ हजार ९३९ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून एकुण ३५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे़
प्रमुख पॅनल
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या ज्ञानतीर्थ पॅनलने विद्यापीठ विकासासाठी आणि विद्यापीठातंर्गत येणाºया महाविद्यालयांना सेवा-सुविधा पुरविण्याचे आश्वासन देत आपले पॅनल उभे केले आहे़ ज्ञानतीर्थ पॅनलने शैक्षणिक विकास, रोजगार, स्वयंरोगार कक्ष, कॅम्पस इंटरव्ह्यू, औद्योगिक प्रशिक्षण सत्र, लघू उद्योगांना पुरक अभ्यासक्रम, कायमस्वरूपी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे, जागतिक दर्जाचे जलतरण तलाव, शाहीर अण्णा भाऊ साठे व डॉ़ शंकरराव चव्हाण अभ्यासकेंद्र स्थापन करणे, आदी विषय मतदारांसमोर ठेवले आहेत़ ज्ञानतीर्थ पॅनलमधून महेश मगर, विक्रम पतंगे, नारायण चौधरी, युवराज पाटील, उदय पाटील, अजय गायकवाड, बालाजी विजापुरे, परशुराम कपाटे, गजानन असोलकर, मिनाक्षी खंदाडे हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत़
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचनेही विद्यापीठ विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडविण्यावर आपली भूमिका समोर केली आहे़ विद्यापीठ विकास मंचचे
दीपक मोरताळे, संदीपान जगदाळे, सुहास टाक, संजय भंडारे, आशिष बाजपाई, सिद्धेश्वर कासनाळे, शिवाजी कोनापुरे, गोविंद अंकुरवार, प्रल्हाद व आशा देशमुख हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ तसेच नसोसवायएफ, राष्ट्रीय समाज पक्ष , फुले आंबेडकर विचार मंच, अखिल भारतीय पिछडा शोषित संघटना आदी समाविचारी संघटनांनी एकत्र येवून विद्यापीठ नवपरीवर्तन पॅनलचे अॅड़ स्वप्नील मुळे, बालाजी कोंडामंगल, अॅड़अस्मिता वाघमारे, रविकुमार सूर्यवंशी, शेषराव पालेपवाड हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत़ खुल्या प्रवर्गातून गजानन लोमटे, एसएफआयचे डॉ़ मेघनाथ उर्फ सचिन खडके निवडणूक लढवित आहेत़