आज सखीमंच नोंदणी
By Admin | Published: March 13, 2016 02:16 PM2016-03-13T14:16:33+5:302016-03-13T14:30:06+5:30
हिंगोली : लोकमत सखीमंच सदस्य नोंदणीस १३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. नोंदणीसाठी शहरात विविध ठिकाणी केंद्र उभारण्यात आले
हिंगोली : लोकमत सखीमंच सदस्य नोंदणीस १३ मार्चपासून प्रारंभ होत आहे. नोंदणीसाठी शहरात विविध ठिकाणी केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्रांवर सकाळी १० ते सायं. ५ या वेळेमध्ये नोंदणी सुरू राहणार आहे.
महिलांच्या कलागुणांना वाव देणारे एक हक्काचे व्यासपीठ म्हणून लोकमत सखीमंच मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहेत. या मंचच्या माध्यमातून महिलांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबरच प्रबोधन आणि बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी सखीमंच सदस्य नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सखीला ५७५ रु. किमतीचे ‘युरो कॅसरोल सेटचे २ नग मिळणार आहेत. सोबतच सखीमंच ओळखपत्र, फिटनेस बुक, एक लाख रुपयांचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा, राज्यस्तरीय सोडतीद्वारे ह्युडांई एलआयओ कार जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
तसेच शहरातील विविध प्रायोजकाद्वारे सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे सखीसाठी ठेवण्यात आलेली आहे. यात सिद्धीविनायक एजन्सीतर्फे १० भाग्यवंतांना रेफ्रीजेरेटर कीट, लोटस सुपर मार्केट तर्फे २० भाग्यवंतांना १० किलो बासमती राईस पॅक, मानस राखीज तर्फे १० भाग्यवंताना ५०० रुपये किमतीचे गिफ्ट हॅम्पर मिळेल. त्याचबरोबर मानस राखीज यांच्यातर्फे होणाऱ्या प्रत्येक सदस्यास हमखास भेटवस्तू व त्यांच्यातील भाग्यवान सदस्याला आकर्षक भेट वस्तू. तर साईकृपा साडी सेंटरतर्फे १० भाग्यवंताना डिझायनर साडी, ओंकार आॅप्टीकल्स्कडून २० भाग्यवंतांना लेडिज फॅन्सी गॉगल्स, परी लेडिज कलेक्शन तर्फे १५ भाग्यवंताना लेडीज फॅन्सी पर्स, एस. कुमार फोटो स्टुडिओ तर्फे ४० भाग्यवंताना फॅशन फोटो, लाठी सारीज तर्फे १५ भाग्यवंताना फॅन्सी कॉटन ड्रेस मटेरिअल, पूजा लेडीज टेलरतर्फे ७ भाग्यवंताना ड्रेस मटेरियल व शिलाई मोफत, रुपकला डिजिटल फोटो स्टुडीओतर्फे २० भाग्यवंताना डिजिटल लॅमिनेशनसोबत फोटो, महालक्ष्मी साडी सेंटरतर्फे १० भाग्यवंताना सिन्थेटिक डिझायनर साडी, श्री गणेश गिफ्ट अॅण्ड नॉव्हेल्टीजतर्फे १० सदस्यांना आकर्षक शॉपिंग बॅग, देवी पद्मावती महिला टंकलेखन संस्थातर्फे १० भाग्यवंतांना फॅन्सी पर्स, एक्सल कॉप्युटरर्स १० भाग्यवंताना युएसबी पेनड्राईव्ह, धनश्री मोर्टस तर्फे १० भाग्यवंताना वॉटर जार, शुभमंगल होलसेल साडी डेपो तर्फे २५ भाग्यवंतांना दांडीया चुनरी साडी. तसेच वाढदिवसानिमित्त एक हजार रुपये किमतीच्या मोफत सेवाही मिळणार आहेत.
लावण्या ब्युटी पार्लरकडून गोल्ड ब्लीच, सुमन ब्युटी पार्लर तर्फे हेअर कट, पुनम ब्युटी पार्लर तर्फे फ्रुट फेशियल फ्री, रुपश्रृंगार ब्युटी पार्लर कडून गोल्ड ब्लीच किंवा हेअर कट फ्री. नाईस ब्युटी पार्लर कडून थ्रेडींग, आर्या ब्युटीपार्लर तर्फे हेअरकट फ्री, संजना ब्युटी पार्लर तर्फे मसाज फ्री मिळणार आहे. राजू डिजिटल फोटो स्टुडीओ यांच्यातर्फे फॅमिली फोटो फ्री दिला जाणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
सदस्य नोंदणी केंद्र
लोकमत हिंगोली जिल्हा कार्यालय पोस्ट आॅफिस रोड बुलडाणा बँकेच्यावर येथे मुख्य नोंदणी केंद्र राहणार आहे. तर महिलांच्या सोयीसाठी त्या-त्या भागातही केंद्र आहेत. यात क्रिश्ना रुहाटीया- तोफखाना, विद्या पवार- नाईकनगर, सुनीता काकडे- यशवंतनगर, रजनी पाटील- तापडिया इस्टेट, दीपाली सरघर- रामाकृष्ण नगर, भारती महाजन- शास्त्री नगर, सुप्रिया पतंगे- आशीर्वाद कॉलनी, सविता येवले- दत्त मंदिर, लीना जाधव- विठ्ठल कॉलनी, सुमन ब्युटी पार्लर- देवडा नगर, सरिता शहाणे- पलटन रोड, परी लेडीज कलेक्शन- हनुमाननगर, जयश्री मालपाणी- मारवाडी गल्ली, जया घन- चिंतामणी मंदिर, उज्ज्वला जिरवणकर- आनंदनगर, सुचित्रा रामगीरवार- देवगल्ली मंगळवारा, युवराज ज्वेलर्स- सातमाता मंदिर, साईकृपा साडी सेंटर- महावीर चौक, विद्या कोरडे- व्यंकटेश हॉस्पिटल, लता चव्हाण- सेनगाव, प्रणिता तडकसे- पुसेगाव, स्वाती वाखरकर- औंढा नागनाथ, रेखा शिंदे- गणेशवाडी येथेही केंद्र आहेत.