आजच्या अशांत जगाला ‘सुफी तत्त्वज्ञाना’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:43 AM2018-01-16T00:43:18+5:302018-01-16T00:43:23+5:30

जागतिक अस्थिरता, अशांतता आणि असहिष्णुतेच्या काळात मानवता प्रेम, विश्वशांती आणि विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य सुफी तत्त्वज्ञानामध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. मुहम्मद आजम यांनी केले. डॉ. आजम यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकरिता नुकतेच ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष सविस्तर इतिहास सांगणाºया या प्रकल्पानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

Today's troubled world requires the need for 'Sufi philosophy' | आजच्या अशांत जगाला ‘सुफी तत्त्वज्ञाना’ची गरज

आजच्या अशांत जगाला ‘सुफी तत्त्वज्ञाना’ची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देतत्त्वज्ञान : ‘सुफी’चा समग्र इतिहास मांडणारे लेखक डॉ. मुहम्मद आजम यांच्याशी संवाद; ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ प्रकल्प

मयूर देवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जागतिक अस्थिरता, अशांतता आणि असहिष्णुतेच्या काळात मानवता प्रेम, विश्वशांती आणि विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य सुफी तत्त्वज्ञानामध्ये आहे, असे प्रतिपादन डॉ. मुहम्मद आजम यांनी केले. डॉ. आजम यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकरिता नुकतेच ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष सविस्तर इतिहास सांगणाºया या प्रकल्पानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
डॉ. आजम अहमदनगर येथील अहमदनगर महाविद्यालयातून हिंदी, उर्दू आणि फारसी भाषेचे प्राध्यापक म्हणून १९९७ साली निवृत्त झाले. ते सुफी तत्त्वज्ञानाकडे फार आधीपासूनच आकर्षित झाले होते. ‘सुफींचे तत्त्वज्ञान म्हणजे साक्षात प्रेममंदिर! तेथे नियमितपणे भक्तीचा सुगंध दरवळतो. भक्तीचे चरमोत्कर्ष रूप म्हणजे प्रेम. अशा सुफी तत्त्वज्ञानाचा मी गेल्या ५० वर्षांपासून अभ्यास करीत आहे, असे ते सांगतात. आपणही याविषयी काही लिहावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांनी ७३ व्या वर्षी ‘सुफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’ हा पहिला ग्रंथ लिहिला. त्याला राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कारासह इतर सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. लोकमत समूहातर्फे दिल्या जाणाºया ‘लोकरंग’ पुरस्काराचेही ते मानकरी ठरले.
२०१६ साली राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून डॉ. आजम यांच्याकडे ‘सुफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ या बृहद प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान, पाश्चात्य तत्त्वज्ञान, इस्लामी तत्त्वज्ञान आणि सुफी तत्त्वज्ञान यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. ते म्हणतात, सुफीवादाचा जन्म इस्लाम धर्माच्या शिकवणुकीतून झाला आहे. इस्लाम धर्म म्हणजे सुफी तत्त्वज्ञानाचा पाया. इस्लामचा अर्थ होतो अमन, शांती.
हा शांतीचा संदेश जगभर पसरविणारे, हे शांतीचे तत्त्व मानवतेमध्ये निर्माण करणारे लोक म्हणजे सुफी संत. साधारणत: सातव्या-आठव्या शतकामध्ये इराणमध्ये सुफी पंथांची सुरुवात झाली. अबू याझीद, अल किंदी, अल फराबी, इब्न मस्काविया, इब्न सीना, अल गजाली अशा संतांनी सुरुवातीच्या काळात सुफी पंथाचा विकास केला. तेथून मग अनेक सुफी संत भारतात आले.
तेराव्या शतकात महंमद तुघलक याने दौलताबादला राजधानी केल्यानंतर अनेक सुफी संत येथे आले आणि त्यांनी शांती आणि सद्भाव निर्माण केला. त्यामुळे मराठवाड्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते.
येथे सुफी संतांची मोठी परंपरा आहे. हजरत जर जरी जर बक्ष, हजरत गंज ए रवाँ, हजरत मोमीन आरिफ, हजरत बाबा शाह मुसाफिर, हजरत बाबा सईद पिलंग पोश, हजरत शहानूरमियाँ हमवी, असे औरंगाबाद, दौलताबाद, खुलताबाद परिसरात अनेक मोठे सुफी संत होऊन गेले. डॉ. आजम यांनी सांगितले की, मराठवाड्यातून खºया अर्थाने सुफीवादाला मोठी चालना
मिळाली.

Web Title: Today's troubled world requires the need for 'Sufi philosophy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.