शौचालयासाठी आता ‘घडीपत्रिका’
By Admin | Published: December 11, 2014 12:24 AM2014-12-11T00:24:49+5:302014-12-11T00:42:25+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जास्तीत जास्त गावे निर्मलग्राम व्हावीत तसेच घर तिथे शौचालय बांधले जावे़ यासाठी येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जास्तीत जास्त गावे निर्मलग्राम व्हावीत तसेच घर तिथे शौचालय बांधले जावे़ यासाठी येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा व स्वछता कक्षाच्या वतीने अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़ शौचालय बांधकामासाठी आता ‘घरीपत्रिका’ मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात येत असून बांधा, वापरा अन् निरोगी रहा, असा नारा देण्यात येत आहे़
तालुक्यातील मोठी गावे निर्मलग्राम व्हावीत़ त्याचबरोबर अनुदानावरील कमी खर्चाचे दोन खड्ड्यांचे ग्रामीण शौचालय बांधले जावे़ यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, मोहन अभंगे, विस्तार अधिकारी बालाजी पोतदार यांनी युनिसेफच्या तांत्रिक सहकार्याने तयार करण्यात आलेल्या दोन भागातील घडीपत्रिका सचित्र डायरीचा उपयोग सुरु केला आहे़ स्वच्छता कक्षाचे विस्तार अधिकारी गोविंद सूर्यवंशी, बालाजी गव्हाणे, विनोद कल्लेकर, रमेश पोरे, विनोद महानवर यांचे पथक तयार करून प्रत्येक कुटुंबाला घरी पत्रिका भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला़
या पत्रिकेत शौचालय कसे बांधावे, खड्डे कसे तयार करावे, कमी खर्चात दर्जेदार शौचालय बांधून त्याचा वापर कसा करावा, याची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे़ बांधकामासंबंधी सहा भागात तर वापरासंबंधी नऊ भागात माहिती देण्यात आली असल्याने शौचालय बांधकामाची चळवळ गतीमान होण्यास मोठी मदत होत आहे़ त्यामुळे विविध गावातील शौचालय बांधकाम करणाऱ्यांकडून घडीपत्रिकेची मागणी होत आहे़ (वार्ताहर)४
दरम्यान, घडीपत्रिका वापरून तालुक्यातील बाकली, बिबराळ, येरोळ, हिप्पळगाव, शिवपूर, हालकी, शिरूर अनंतपाळ, वांजरखेडा या आठ गावांत सुरु असलेल्या शौचालय बांधकामाचा आढावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम पटवारी, समन्वयक प्रमोद हुडगे यांनी मंगळवारी स्वच्छता कक्षासंबंधी माहिती दिली़