टोमॅटो फेकले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:08 AM2018-09-26T00:08:36+5:302018-09-26T00:12:37+5:30
अवघ्या २ ते ४ रुपये किलोनेही विक्री न झालेले टोमॅटो अखेर शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिले. सर्वत्र वाढलेली आवक आणि त्यात उठावही नसल्याने मातीमोल भावात टोमॅटो विकल्या जात आहेत. फेकलेल्या टोमॅटोंवर गायी, म्हशींनी मनसोक्त ताव मारला.
औरंगाबाद : अवघ्या २ ते ४ रुपये किलोनेही विक्री न झालेले टोमॅटो अखेर शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिले. सर्वत्र वाढलेली आवक आणि त्यात उठावही नसल्याने मातीमोल भावात टोमॅटो विकल्या जात आहेत. फेकलेल्या टोमॅटोंवर गायी, म्हशींनी मनसोक्त ताव मारला.
सध्याचे वातावरण टोमॅटोंसाठी पोषक आहे. यामुळे टोमॅटोंचे विक्रमी उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात चोहोबाजूने टोमॅटोंची जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होत आहे. कृउबाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे १८ टन टोमॅटोंची आवक झाली. होलसेल व्यवहारात २०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भावात टोमॅटो विक्री झाले. अडत व्यापाºयांनी सांगितले की, २० किलो टोमॅटो २० ते ५० रुपयांना विक्री झाले. या भावातही मागणी नव्हती. सर्वत्र टोमॅटोच दिसत होते. उन्हामुळे टोमॅटो लवकर खराब होतात. अखरे शिल्लक राहिलेलेले टोमॅटो रस्त्यावरच फेकून देऊन शेतकरी घरी निघून गेले. दुपारी १ वाजेदरम्यान जाधववाडीत अनेक ठिकाणी टोमॅटोंचे ढीगच्या ढीग दिसून आले. त्यावर शेकडो गायी, म्हशींनी मनसोक्त ताव मारला. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व टोमॅटो जनावरांनी फस्त केले होते. विशेष म्हणजे अडत बाजारात २ ते ४ रुपये किलोने विक्री होणारे टोमॅटो हातगाडीवाले गल्लोगल्ली १५ रुपये किलोने विकत होते, तर स्वच्छ व धुतलेले हेच टोमॅटो भाजीमंडीत १५ ते २० रुपये किलोने विकले जात होते. यात शेतकºयांना व ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
शंकर जोगदंड या शेतकºयाने सांगितले की, मातीमोल भावात टोमॅटो विकत असल्याने शेतातून काढून जाधववाडीत विक्रीसाठी आणणेही परवडत नाही. काही व्यापारी अपप्रचार करतात की, हलक्या प्रतीचे टोमॅटो फेकून दिले; पण तसे नाही. तेच टोमॅटो हे व्यापारी भाजीमंडीत महागड्या दराने विकत आहेत.
चौकट
मध्यप्रदेशातील लसूण
मागील वर्षी १०० रुपये किलोपर्यंत विक्री झालेला लसूण सध्या अडत बाजारात ५ ते १५ रुपये किलोने विकला जात आहे. मध्यप्रदेशात लसणाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात लसूण बाजारात विक्रीला येत आहे.
कॅप्शन
१) शेतकºयांनी फेकून दिलेल्या टोमॅटोंवर गायी, म्हशींनी असा ताव मारला.
२) मध्यप्रदेशातील लसूण विक्रीविना दुकानात थप्पीच्या थप्पी पडून होता.