फतियाबाद बनले ‘टोमॅटो हब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2016 12:39 AM2016-10-07T00:39:41+5:302016-10-07T01:26:08+5:30
अमीर शेख , दौलताबाद औरंगाबाद नाशिक महामार्गावरील फतियाबाद (ता. गंगापूर) या गावातून दररोज २५ ते ३० मोठे ट्रक भरून टमाटे दिल्ली, गुजरात या राज्यांत जात असल्याने
अमीर शेख , दौलताबाद
औरंगाबाद नाशिक महामार्गावरील फतियाबाद (ता. गंगापूर) या गावातून दररोज २५ ते ३० मोठे ट्रक भरून टमाटे दिल्ली, गुजरात या राज्यांत जात असल्याने या परिसराची ‘टोमॅटो हब’ म्हणून ओळख बनली आहे.
फतियाबादसह परिसरातील जांभाळा, माळीवाडा, आसेगाव, रामपुरी, केसापुरी, टेकलवाडी, वंजारवाडी, टेकल वाडी, पाच पीरवाडी आदी गावामधील शेतक ऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टमाट्यांची लागवड केली आहे. यामुळे दिल्ली, गुजरात राज्यातील व्यापारी फतियाबाद येथे येऊन टमाटे खरेदी करतात. गावातच शेतकऱ्यांना रोख पैसे मिळत आहेत. पूर्वी येथील शेतकऱ्यांचा ओढा कपाशी पिकाकडे होता. टमाट्याच्या एका कॅरेटला १८० रुपये याप्रमाणे भाव मिळत आहे. सध्या पावसामुळे टमाट्याचा रंग हा तिरंगी होत आहे. तसेच ते नरमही होत आहेत, त्यामुळे भाव कमी मिळत आहे. टमाटे हंगाम हा दोन महिने असतो. टमाट्याची लागवड जून महिन्यात करतात. त्यानंतर दोन महिन्यात फळ लागायला सुरुवात होते. त्यावर तीन ते चार वेळा फवारणी करावी लागते अशी माहिती शेतकरी भारत भास्कर यांनी दिली.
फतियाबाद परिसरातील टमाटे हे चांगल्या दर्जाचे असून ते लवकर खराब होत नाहीत, अशी माहिती दिल्ली येथील व्यापारी इंदर कुमार यांनी दिली. टमाट्यामुळे फतियाबादचे नाव देशपातळीवर गेले आहे. टमाट्याच्या उत्पादनामुळे फतियाबाद परिसरात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.