टमाटे ८० रुपये किलो
By Admin | Published: July 17, 2017 12:52 AM2017-07-17T00:52:19+5:302017-07-17T00:59:31+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगर व परिसरात पाऊस अत्यल्प असून, आवक अचानक मंदावल्याने भाजीपाल्यासह टमट्यांचे भाव गगनाला भिडले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज महानगर व परिसरात पाऊस अत्यल्प असून, आवक अचानक मंदावल्याने भाजीपाल्यासह टमट्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टमाट्याला प्रतिकिलोस ८० रुपये मोजावे लागत आहेत.
वाळूज महानगरातील पंढरपूरच्या भाजी बाजारात भाजीपाल्याची आवक मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे टमाटा वधारून ७० ते ८० रुपये किलोपर्यंत चढला आहे. इतर कोणताही भाजीपाला व फळभाज्या ६० रुपये किलोच्या कमी नाहीत. त्यामुळे येथील कामगार कुटुंबिय संकटात सापडले आहेत. मिरचीचे भाव कमी जास्त होत आहेत. सोमनाथ खाकरे या भाजीपाला विक्रेत्याने सांगितले की, गोलवाडी, तीसगाव, वडगाव, रांजणगाव, रामराई, कमळापूर, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, बकवालनगर, वाळूज, नारायणपूर, शिवराई आदी गावांतून नागरिक भाजीपाला खरेदीसाठी पंढरपुरात येतात; परंतु महागाईमुळे भाजीपाला घेता येत नसल्यामुळे ते संताप व्यक्त करीत आहेत.