दौलताबाद किल्ल्यावर लवकरच तोफांचे संग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:09 AM2018-12-23T01:09:51+5:302018-12-23T01:10:43+5:30
ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यातील सर्व तोफा एकत्र करून तेथेच तोफांचे संग्रहालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
दौलताबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्यातील सर्व तोफा एकत्र करून तेथेच तोफांचे संग्रहालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
या किल्ल्याला पाच तटबंदी असून, त्यांच्या संरक्षणासाठी सात तटबंदी असून तटबंदी व त्याच्या बुरुजांवर लहान-मोठ्या शेकडो तोफा ठेवलेल्या आहेत. या तोफांचे संरक्षण करणे अवघड असल्यामुळे पुरातत्व विभागाने त्या तोफा सुरक्षित ठिकाणी राहाव्या, यासाठी किल्ला परिसरात भारतमाता मंदिराच्या पाठीमागे व चाँदमिनारसमोर सदर तोफांचे नवीन संग्रहालय सुरू करण्याचे ठरविले आहे. याचे कामही प्रगतिपथावर आहे. हे संग्रहालय लवकरच पर्यटकांना पाहण्यासाठी सुरू करण्यात येणार आहे.
तोफा एकाच ठिकाणी असल्यामुळे त्या जवळून पाहता येतील व त्याचा इतिहास सर्वांना कळेल, असे किल्ल्याचे सहायक संवर्धक एस. बी. रोहनकर यांनी सांगितले.
त्याच अनुषंगाने दौलताबाद किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवरील सर्व तोफा जमा करण्याचे काम दौलताबाद किल्ला कर्मचाऱ्यांनी सुरूकेले आहे.
फोटो....दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात बाहेरील तटबंदीवरील तोफा जमा करण्याचे काम सुरू आहे. दौलताबाद -माळीवाडा रस्त्यावरील तोफ उचलताना किल्ल्याचे कर्मचारी.
निधन वार्ता
विलास आव्हाळे यांचे निधन
नाचनवेल : कन्नड तालुक्यातील हस्ता येथील प्रगतिशील शेतकरी विलास चिमणराव आव्हाळे (४८) यांचे आज दि. २२ शनिवार रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुले, मुली,भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.