अर्थव्यवस्थेची वाटचाल विषयावर उद्या चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:25 AM2017-09-25T00:25:50+5:302017-09-25T00:25:56+5:30
खास चार्टर्ड अकाऊंटट, विद्यार्थी व नागरिकांसाठी उपयुक्त असे ‘अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन मंगळवार २६ रोजी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खास चार्टर्ड अकाऊंटट, विद्यार्थी व नागरिकांसाठी उपयुक्त असे ‘अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन मंगळवार २६ रोजी केले आहे.
लोकमत व द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटट आॅफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र घेण्यात येणार आहे. जालना रोडवरील लोकमत भवनच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता चर्चासत्राला सुरुवात होणार आहे. यावेळी आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे व बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष सीए मंगेश किनारे, केंद्रीय समितीचे सदस्य सीए प्रफुल्ल छाजेड व सीए अनिल भंडारी यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल कशी राहील, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय चार्टर्ड अकाऊंटट आणि सीएच्या नूतन अभ्यासक्रमाची अद्ययावत माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९९६०५८८८८५ या नंबरवर संपर्क साधावा. चर्चासत्र उपयुक्त असून याचा फायदा सीए, विद्यार्थिनी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सीए संघटनेचे अध्यक्ष सीए अल्केश रावका यांनी केले आहे.