सायन्समधील नावीन्यपूर्ण करिअरबद्दल उद्या सेमिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:13 AM2018-01-11T01:13:10+5:302018-01-11T01:13:14+5:30
विज्ञान शाखेमध्ये शिकणा-या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नव्या युगातील नव्या करिअरबद्दल माहिती देण्यासाठी ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ आणि ‘लोकमत’तर्फे शुक्रवारी (दि.१२) एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विज्ञान शाखेमध्ये शिकणा-या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नव्या युगातील नव्या करिअरबद्दल माहिती देण्यासाठी ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ आणि ‘लोकमत’तर्फे शुक्रवारी (दि.१२) एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत भवन येथे सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. सेमिनारमध्ये मोटिव्हेशनल स्पीकर विवेक मेहेत्रे आणि ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’मधील आॅटोमोबाईल इंजिनिअरिंगचे प्रमुख प्रा. डॉ. एम. लिनस मार्टिन आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे सहयोगी प्रा. डॉ. आरिफ अली बेग मार्गदर्शन करणार आहेत.
बारावीनंतर पुढे काय? हा पालक आणि विद्यार्थ्यांसमोरील मोठा प्रश्न असतो. पुरेशा माहितीअभावी योग्य निर्णय किंवा पर्याय कोणता याची निवड करताना गोंधळ उडतो. अशा वेळी जर योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले तर उज्ज्वल भविष्याची योग्य वाट मिळण्यास मदत होते. अशीच संधी या सेमिनारद्वारे उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी-पालकांच्या मनातील ‘पुढे काय?’ या प्रश्नाची जागा ‘पुढे उज्ज्वल भविष्य’ असा सकारात्मक विचार
घेईल.
सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ८८५६८००३०१ या क्रमांकावर आपले नाव, वर्ग (इयत्ता) एसएमएस करावा.
चाचणी परीक्षेद्वारे बक्षिसे जिंकण्याची संधी
सेमिनार सुरू होण्याआधी दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान एक चाचणी परीक्षा घेतली जाणार असून, प्रथम क्रमांक मिळविणाºया विद्यार्थ्यासाठी एक टॅब, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी मोबाईल आणि उत्तेजनार्थ दोन पेन ड्राईव्ह, अशी भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान विषयातील ५० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील.
सेमिनारचे वैशिष्ट्ये व विषय
विवेक मेहेत्रे डिजिटल प्रेझेंटेशनद्वारे हे पुढील विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत :
आत्मविश्वास व ध्येयनिश्चिती
यशाचे महत्त्व
यशस्वी लोक ांच्या यशाचे रहस्य
नियोजन का व कसे करावे?
आपले यश आपल्याच हाती!
बारावीनंतर अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व
अभियांत्रिकी क्षेत्रामधील संधी