रस्त्यावरील टपऱ्यांवर जीभेचे लाड, पण पाणी कोणते पिताय? आरोग्याचे काय?
By साहेबराव हिवराळे | Published: July 11, 2024 07:16 PM2024-07-11T19:16:35+5:302024-07-11T19:17:37+5:30
विविध रहदारीच्या चौकात खवय्येगिरीची दुकाने व टपऱ्या खूप परिचित आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहरात रस्त्यांवरील टपऱ्यांवर आरोग्याच्या बाबतीत किती काळजी घेतली जाते? अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे नियंत्रण टाळण्यावर जास्त भर दिला जात आहे. तुम्ही पोट भरण्याच्या कालावधीत काही गोष्टींकडे कानाडोळा करतात अन् पोटदुखी अन् ॲसिडीटीचे प्रकार समोर येतात त्यामुळे नागरिकांना डोकेदुखी, मळमळ उलट्यांचा त्रासही सहन करावा लागतो. ज्या ठिकाणी खाद्यपदार्थावर उड्या पडलेल्या दिसतात ते अन् उघड्यावर असते, वापरलेले तेल पुन्हा वापरात घेतले जाते. अशा अनेक घटना घडतात त्याचा परिणाम मात्र आरोग्यावर होतो.
या ठिकाणी विक्री
सिडको कॅनॉट, सिडको, हडको, रेल्वे स्टेशन , शहागंज, सातारा- देवळाई , शिवाजीनगर, छावणी, चिकलठाणा, वाळूज,शेंद्रा आदीसह विविध रहदारीच्या चौकात खवय्येगिरीची दुकाने व टपऱ्या खूप परिचित आहेत. परंतु अनेकांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना हुलकावणी देत काही नोंद नाही आणि भरमसाट व्यवसायावर भर दिलेला दिसतो आहे.
पाणी किती स्वच्छ?
शहरात पाणी पुरवठ्याचे तीन तेरा झाले असून, व्यावसायिक खाऊच्या दुकानावर नळाचे पाणी असेलच अशी व्यवस्था टाळली जाते. प्लास्टिकचा जार ठेवला जातो. तो जार शुद्ध की अशुद्ध पाण्याचा आरोग्य बिघडण्यासाठीचा आहे हे फक्त नशीबच ठरते.
नाष्टा किती आरोग्यदायी
औद्योगिक क्षेत्रात मिळणारा नाष्टा किती आरोग्यदायी आहे असे सांगता येत नाही, कामावर थकलेेला व्यक्ती नाष्टा मिळेल तो खातो आणि दिवसभर कष्ट करतो अचानक बाहेरचे खाण्यात आल्याने पोट बिघडले असे म्हणून दवाखाने गाठताना दिसतात.
पाणीपुरीत कोणते पाणी...
पाणीपुरी अगदी आवडीने आपण लेकरा बाळासह खातो परंतु त्यात वापरणारे मसाले पाणी आरोग्यदायीच कशावरून त्यांचीही तपासणी होताना दिसत नाही.
ना परवाना, ना कुठली तपासणी
गर्दीच्या ठिकाणी स्टॉल उभारून कमाई केली जाते परंतु आरोग्यदायी पदार्थ खाण्यास मिळत नाही.त्यांच्याकडे परवाना देखील कुठे दिसत नाही,
सहा महिन्यांत किती टपऱ्यांवर कारवाई?
सहा महिन्यांत काही आस्थापनाला भेटी देऊन त्यांची खाद्यपदार्थाची तपासणी केलेली आहे. परंतु टपऱ्या मात्र मोकाट सोडलेल्या आहे. त्याकडे का लक्ष दिले जात नाही. असा प्रश्न उठतो तेव्हा पाणीपुरी, स्टॉल तपासणीची मोहीम हाती घेतलेली असून, लवकर कारवाई होणार आहे.
- निखिल कुलकर्णी,निरीक्षक अन्न व औषध प्रशासन