सिल्लोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:29 AM2019-01-21T00:29:39+5:302019-01-21T00:29:42+5:30

महिलेला विवस्त्र करून मारहाण : १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

 Tornado riot in two groups at Sillod | सिल्लोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी

सिल्लोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी

googlenewsNext

सिल्लोड : सिल्लोड शहरातील सराफा मार्केटमधील घर व दुकानाच्या वादावरून रविवारी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी महिलेला विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या ९ जणांविरुद्ध तर एकाचे दात पाडल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध अशा एकूण १५ जणांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली.
मंगलाबाई सीताराम बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमची जागा हडपण्यासाठी आमच्या विरुद्ध न्यायालयात खोटे दावे दाखल करून आमच्या दुकानात व घरात बेकायदा घुसून अंगावरील कपडे फाडून विवस्त्र करून मला बेदम मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी रामदास विठ्ठल वाघ, मुरलीधर विठ्ठल वाघ, धनंजय रामदास वाघ, बाबूराव विठ्ठल वाघ, गयाबाई बाबूराव वाघ, शशिकांत मुरलीधर वाघ, सोनाली धनंजय वाघ, सीमा संतोष वाघ, संगीताबाई रामदास वाघ (सर्व रा. सिल्लोड) या ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तसेच हक्काच्या जागेवर दुकानात घुसून मारहाण करून मुरलीधर वाघ यांचे दात पाडल्याप्रकरणी पोलिसांनी धनंजय रामदास वाघ (रा. सिल्लोड) यांच्या फिर्यादीवरून मनकर्णाबाई देविदास वाघ, मंगलाबाई सीताराम बोराडे, राहुल सीताराम बोराडे, किशोर सीताराम बोराडे, अमोल सीताराम बोराडे (रा. सिल्लोड) व मीनाबाई तुकाराम हरणे (रा. औरंगाबाद) या सहा जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख करीत आहेत.

Web Title:  Tornado riot in two groups at Sillod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.