बर्थ सर्टिफिकेट काढताना पालकांना यातना; मनपा वॉर्ड कार्यालयांमध्ये अर्जांचे ढिगारे

By मुजीब देवणीकर | Published: August 19, 2023 12:50 PM2023-08-19T12:50:53+5:302023-08-19T12:51:18+5:30

कोणत्या ॲपवरून ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवावे, हे नागरिकांना माहीतच नाही.

Torture of parents while obtaining birth certificate; Piles of applications in municipal ward offices | बर्थ सर्टिफिकेट काढताना पालकांना यातना; मनपा वॉर्ड कार्यालयांमध्ये अर्जांचे ढिगारे

बर्थ सर्टिफिकेट काढताना पालकांना यातना; मनपा वॉर्ड कार्यालयांमध्ये अर्जांचे ढिगारे

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जन्म घेतलेल्या प्रत्येक बाळाचे बर्थ सर्टिफिकेट महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयातून घ्यावेच लागते. नागरिकांना मनपाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येऊ नये, म्हणून प्रशासनाने ऑनलाइन सोय केल्याची घोषणाही केली. ऑनलाइन प्रमाणपत्रासंदर्भात जनजागृतीच नसल्याने ९९ टक्के पालक वॉर्ड कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करीत आहेत. शुक्रवारपर्यंत विविध वॉर्ड कार्यालयांमध्ये शेकडोंच्या संख्येने अर्जांचे गठ्ठे पडून असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. मृत्यू प्रमाणपत्राची गतही तशीच आहे, हे विशेष.

महिनाभरापूर्वी महापालिकेने विविध १६ सेवा ऑनलाइन केल्याची घोषणा केली. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ॲपचे लोकार्पणही करण्यात आले. नागरिकांना घरबसल्या जन्म- मृत्यू प्रमाणपत्र मिळेल, असेही सांगण्यात आले. प्रत्यक्षात परिस्थिती निराळीच आहे. कोणत्या ॲपवरून ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवावे, हे नागरिकांना माहीतच नाही. ऑनलाइन प्रमाणपत्र मोजक्याच काही नागरिकांनी काढले, त्यावर बाळाचे नाव नसते. नाव टाकण्यासाठी वॉर्ड कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. शुक्रवारी ‘लोकमत’ने सर्व वॉर्ड कार्यालयांचा आढावा घेतला असता विदारक चित्र काही ठिकाणी निदर्शनास आले. वॉर्ड कार्यालय सहामध्ये एकही अर्ज प्रलंबित नाही; पण अन्य आठ वॉर्ड कार्यालयांमध्ये ‘पेन्डन्सी’ दिसून आली.

काय म्हणतात वॉर्ड अधिकारी?
- वॉर्ड क्रमांक पाचमध्ये काही दिवसांपासून संगणक आणि प्रिंटरमध्ये बिघाड झालाय. त्यामुळे थकीत अर्जांची संख्या वाढली आहे. एरव्ही दोन दिवसांत प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
-सविता सोनवणे, वॉर्ड अधिकारी

- वॉर्ड क्रमांक तीनमध्ये अनेक पालक बर्थ सर्टिफिकेटसाठी अर्ज दाखल करून निघून जातात. परत अर्ज घेण्यासाठी येतच नाहीत. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण जास्त आहे. जेव्हा गरज असेल तेव्हाच प्रमाणपत्र घेण्यासाठी येतात.
-नईम अन्सारी, वॉर्ड अधिकारी

वॉर्ड क्रमांक सातमध्ये दररोज ५० ते ५५ अर्ज जन्म प्रमाणपत्रासाठी येतात. या भागात रुग्णालयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकाच दिवसात निपटारा शक्य नसतो. दोन ते तीन दिवसांत नागरिकांना प्रमाणपत्र मिळते.
-प्रसाद देशपांडे, वॉर्ड अधिकारी

थकीत अर्जांचा तपशील
वॉर्ड- जन्म दाखला- मृत्यू प्रमाणपत्र

०१---१२५-------१२
०२---२०--------०३
०३---५००------००
०४---२५-------०८
०५---४५------०४
०६---००------००
०७---३८९-----१५
०८---१२------०८
०९---३०-------१७

Web Title: Torture of parents while obtaining birth certificate; Piles of applications in municipal ward offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.