पुणे, नागपूर, गोवा विमानसेवेसाठी ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 12:40 PM2023-08-20T12:40:18+5:302023-08-20T12:40:30+5:30
टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून पुणे, नागपूर आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सकडे केली आहे.
या एअरलाइन्सच्या मुख्य महसूल अधिकाऱ्यांसोबत जवळपास दीड तासांच्या बैठकीत सुनीत कोठारी यांनी विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर पुणे, नागपूर, जळगाव आणि गोव्याशी विमानसेवेने जोडण्यासंदर्भात चर्चा केली. गोव्यात मुख्यालय असलेली ही विमान कंपनी विमानसेवा सुरू करणार आहे. ७२ आसनी एटीआर विमानाद्वारे सेवा दिली जाणार आहे. मार्च २०२४ पर्यंत त्यांच्याकडील विमानांची संख्या ६ पर्यंत वाढणार आहे.
शहरातून सध्या कुठे विमानसेवा?
छत्रपती संभाजीनगरहून सध्या इंडिगो आणि एअर इंडियाच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू आहे. अहमदाबाद, उदयपूरसह विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
‘फ्लाय ९१’कडे या विमानसेवेची मागणी
- छत्रपती संभाजीनगर - पुणे
- छत्रपती संभाजीनगर - नागपूर
- छत्रपती संभाजीनगर - गोवा
- जळगाव - मुंबई
- जळगाव - पुणे
- जळगाव - इंदूर