शुक्रवारपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:05 AM2021-06-16T04:05:31+5:302021-06-16T04:05:31+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे शुक्रवारपासून खुली होतील; परंतु पर्यटकांची गर्दी होऊ नये, यासाठी अनेक निर्बंध असतील, अशी माहिती ...

Tourist places in the district will be open from Friday | शुक्रवारपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली होणार

शुक्रवारपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली होणार

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे शुक्रवारपासून खुली होतील; परंतु पर्यटकांची गर्दी होऊ नये, यासाठी अनेक निर्बंध असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून पर्यटनस्थळे बंद आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित असलेली ऐतिहासिक पर्यटनस्थळे, स्मारके, संग्रहालये १६ जूनपासून उघडण्याचे आदेश पुरातत्व विभागाने दिले असले तरी अंतिम निर्णय जिल्हाधिकारी चव्हाण घेणार असल्यामुळे बुधवारपासून पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय झाला नाही.

जिल्ह्यात वेरूळ, अजिंठा लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला, खुलताबाद येथील औरंगजेब कबर यासह अनेक पर्यटन वास्तू आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आठ महिने सदरील पर्यटनस्थळे बंद होती. त्यानंतर ती खुली करण्यात आली; परंतु पुन्हा मार्चमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयावह परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे पर्यटनस्थळे बंद करावी लागली. ७ जूनपासून जिल्ह्यात अनलॉकचा निर्णय झाला असला तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असल्यामुळे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळे सुरू करण्याची परवानगी देताना अनेक अटींचे बंधन घालण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार असे दोन हजार पर्यटक पर्यटनस्थळांना भेट देऊ शकतील. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असणार आहे.

दोन दिवसांत निर्णय होणार

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, पर्यटनस्थळे शुक्रवारपासून खुली करण्यात येणार आहेत. परंतु तत्पूर्वी किमान दोन दिवस सर्व पर्यटनस्थळे स्वच्छ करण्यासाठी मुदत द्यावी लागेल. तसेच सर्व पर्यटनस्थळांच्या आवारातील दुकाने, विक्रेत्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. गेल्या लॉकडाऊननंतर दोन हजार पर्यटकांना पर्यटनस्थळ आवारात येण्यासाठी परवानगी दिली होती. तसेच ऑनलाइन नोंदणी करणेही बंधनकारक करण्यात आले होते. यावेळी किती पर्यटकांना परवानगी द्यायची, त्याचा निर्णय या दोन दिवसांत होईल.

Web Title: Tourist places in the district will be open from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.