बारामती तालुक्यातून ट्रॅक्टर चोरून आणणारा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:05 AM2021-05-21T04:05:02+5:302021-05-21T04:05:02+5:30
चोरीचे ट्रॅक्टर विक्रीसाठी एक जण येणार असल्याची माहिती खबऱ्याने एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ...
चोरीचे ट्रॅक्टर विक्रीसाठी एक जण येणार असल्याची माहिती खबऱ्याने एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमरनाथ नागरे, हवालदार मुनीर पठाण, दीपक शिंदे, नितेश सुंदरडे यांच्या पथकाने नारेगाव कचरापट्टी येथे सापळा रचला असता संशयित ट्रॅक्टर त्यांनी अडविले. ट्रॅक्टरचालक अंकुश याला ट्रॅक्टरच्या मालकीहक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांचा संशय बळावताच त्यांनी त्याला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली वाकी (ता. बारामती) येथील रवींद्र सावंत यांच्या शेतातून हा ट्रॅक्टर चोरी करून आणला. हे ट्रॅक्टर विक्री करण्यासाठी तो ग्राहक शोधत असल्याचे म्हणाला. पोलिसांनी त्याच्या म्हणण्यानुसार पडताळणी केली असता वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात अभिजीत अशोक बालगुडे यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टरचोरीचा गुन्हा नोंद असल्याचे समजले.
====
चौकट
मालेगाव-मुंबई रस्त्यावर सोडल्या दोन ट्रॉली
आरोपीने दोन ट्रॉलींसह ट्रॅक्टर चोरला. ट्रॉलीमुळे ट्रॅक्टरचा वेग वाढत नसल्याने त्याने मालेगाव-मुंबई रस्त्यावर दोन्ही ट्रॉली बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे पोलिसांना सांगितले. या आरोपीची माहिती पो. नि. पोटे यांनी वडगाव निंबाळकर ठाण्याच्या निरीक्षक यांना कळविली.