सात दिवसांच्या आत कोरोना चाचणी करणे व्यापाऱ्यांना बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:05 AM2021-06-10T04:05:27+5:302021-06-10T04:05:27+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी शासन नियमानुसार आलेली वर्गवारी तिसऱ्या स्तरात आहे. त्यानुषंगाने नोडल अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी शासन नियमानुसार आलेली वर्गवारी तिसऱ्या स्तरात आहे. त्यानुषंगाने नोडल अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन सात दिवसांच्या आत सर्व दुकानदारांनी स्वतः सह आपल्याकडील कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. हा तपासणी अहवाल दुकानांच्या दर्शनी भागावर लावणे अनिवार्य केले आहे. दिलेल्या कालावधीत कोरोना चाचणी न करता दुकान चालू ठेवल्याचे आढळून आल्यास दंड आकारून सदरील दुकान सील करण्यात येईल, असे व्यापाऱ्यांना सांगण्यात आले. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या पाहता कोरोना नियमांचे नियमितपणे पालन करण्यात यावे आशा सूचनादेखील प्रशासनाच्या वतीने व्यापाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी प्रभारी तहसीलदार सारिका शिंदे, नायब तहसीलदार अविनाश अंकुश, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महेंद्र गुंदेजा, गंगापूर, शिल्लेगाव व वाळूज येथील पोलीस ठाण्याचे अधिकारी व तालुक्यातील प्रा. आ. केंद्राचे कर्मचारी हजर होते.