वाळूज महानगरात आरटीपीसीआर चाचणी करण्यास व्यापारी उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:04 AM2021-07-11T04:04:51+5:302021-07-11T04:04:51+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती:ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग हतबल कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती : ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग ...
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती:ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग हतबल
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती : ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग हतबल
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील व्यापारी आरटीपीसीआर चाचण्या करण्यास उदासीन असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. ग्रामपंचायती व आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करुन बहुतांश व्यापारी व दुकानदार चाचण्या करण्यास पुढे येत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनलॉक झाल्यानंतर व्यापारी व दुकानात काम करणाऱ्या कामगारांना आरटीपीसीआर चाचणी करून प्रमाणपत्र दुकानात ठेवणे बंधनकारक केले आहे. वाळूज, पंढरपूर, रांजणगाव, वडगाव-बजाजनगर, तीसगाव, रांजणगाव, जोगेश्वरी आदी ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती अभियान राबविले आहे. याचबरोबर गावातील दुकानदार व विविध व्यावसायिकांना नोटिसा बजावून कोविड चाचणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहे. काही अपवाद वगळता वाळूज महानगर परिसरातील बहुतांश व्यापारी व व्यावसायिक कोविड चाचणी करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
चाचणी न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार
प्रभावीपणे जनजागृती करून तसेच नोटिसा बजावूनही व्यापारी कोविड चाचण्या करून घेण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे. कोविड चाचण्या न करणाऱ्या दुकानदार, कामगार व व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा जोगेश्वरीचे सरपंच गजानन बोंबले, उपसरपंच प्रवीण दुबीले, ग्रामविकास अधिकारी बी. एल. भालेराव, वाळूजच्या सरपंच सईदाबी पठाण, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे, पंढरपूरच्या सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा अख्तर, ग्रामविकास अधिकारी हरीष आंधळे, रांजणगावचे ग्रामविकास अधिकारी एस. एन. रोडकले आदींनी दिला आहे.
----------------------------------