कोरोनाच्या सावटाखाली परंपरागत गुढीपाडवा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:04 AM2021-04-14T04:04:16+5:302021-04-14T04:04:16+5:30
घाटनांद्रा : चैत्र बलिप्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस. अर्थात गुढीपाडवा सण साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या ...
घाटनांद्रा : चैत्र बलिप्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस. अर्थात गुढीपाडवा सण साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या सणावर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट पसरले आहे. मंगळवारी घाटनांद्रा गावात घरोघरी साध्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला गेला. गुढीला साक्षात लक्ष्मीचे रूप समजले जाते. घरोघरी गुढी उभारून तिची पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चना केली गेली.
देवाकडे, निसर्गाकडे प्रार्थना करून देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, अशी प्रार्थना घरोघरी नागरिकांनी केली. घराघरांमध्ये शुभमुहूर्तावर मंगलमय वातावरणात गुढ्या उभारण्यात सर्व जण दंग झाले होते. गुढी उभारण्यासाठी भरजरी पैठणी, शालू लावून नवीन पालवी फुटलेल्या लिंबाच्या पानाचा डघळा, आंब्याची पाने, फुलांचा हार घालून तसेच गाठीचा हार लावून वरती कलश ठेवण्यात आला. यावेळी दाराला आंब्याचे तोरणेही बांधण्यात आली.